
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे कार्यक्षम नगरसेवक शीतल उर्फ विजय गोरख शिंदे यांची भारतीय जनता पक्षाच्या ओबीसी मोर्चाच्या महाराष्ट्र प्रदेश सचिवपदी निवड झाल्याबद्दल त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
सामाजिक व राजकीय क्षेत्रात सक्रियपणे कार्यरत असलेल्या गोरखशिंदे यांनी नागरिकांच्या विविध प्रश्नांसाठी सातत्याने पाठपुरावा केला आहे. त्यांच्या कार्याची दखल घेत पक्षाने त्यांच्यावर महाराष्ट्र प्रदेश पातळीवरील महत्त्वाची जबाबदारी सोपविली आहे.
या निवडीमुळे पिंपरी-चिंचवडमधील भाजपच्या संघटनात्मक कार्याला तसेच ओबीसी मोर्चाच्या विस्ताराला अधिक बळ मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली ओबीसी समाजाच्या विविध प्रश्नांना व मागण्यांना प्रभावीपणे वाचा फोडण्यासाठी आपण प्रयत्नशील राहणार असल्याचे गोरखशिंदे यांनी सांगितले.
दरम्यान, नगरसेविका सौ. अनुराधा गणपत वाघमारे यांच्यासह पक्षातील पदाधिकारी, कार्यकर्ते, समर्थक व नागरिकांनी गोरखशिंदे यांचे अभिनंदन करून त्यांच्या पुढील राजकीय वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
