Spread the love

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज)  – विलास गुलाबराव सोनवणे यांची महाराष्ट्र शासन नियुक्त विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या सामाजिक व सार्वजनिक क्षेत्रातील कार्याची दखल घेत ही जबाबदारी सोपविण्यात आल्याने त्यांच्या समर्थक व मित्रपरिवारातून आनंद व्यक्त केला जात आहे.

महाराष्ट्र शासनाच्या वतीने नियुक्ती झाल्यानंतर सोनवणे यांच्यावर विविध शासकीय कामकाजात समन्वय साधण्याची तसेच नागरिकांच्या समस्या शासनाच्या निदर्शनास आणून देण्यासाठी कार्य करण्याची महत्त्वाची जबाबदारी राहणार आहे.

या नियुक्तीबद्दल विलास गुलाबराव सोनवणे यांचे विविध मान्यवर, पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिकांनी अभिनंदन केले असून, त्यांच्या पुढील सामाजिक  कार्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

Share.
Leave A Reply

Please Join Our WhatsApp Group
Exit mobile version