Spread the love

 

चिंचवड, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – दिशा सोशल फाऊंडेशन, पिंपरी-चिंचवड यांच्या वतीने ‘खऱ्या अर्थाने जननायक’ या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात आयुक्त-अन्न व औषध प्रशासन, महाराष्ट्र राज्य तुकाराम मुंढे (भा.प्र.से.) नागरिकांशी मनमोकळा संवाद साधणार आहेत.

‘भ्रष्टाचारमुक्त महाराष्ट्र, आरोग्यदायी महाराष्ट्र’ या विषयावर तुकाराम मुंढे आपले विचार मांडणार असून, नागरिकांच्या विविध प्रश्नांवरही संवाद साधला जाणार आहे. ज्येष्ठ पत्रकार मयुरेश कोणेकर हे कार्यक्रमाचे संवादक म्हणून उपस्थित राहणार आहेत.

हा कार्यक्रम शनिवार, २२ ऑगस्ट २०२६ रोजी सायंकाळी ५.३० वाजता प्रा. रामकृष्ण मोरे नाट्यगृह, चिंचवड येथे आयोजित करण्यात आला आहे. कार्यक्रमासाठी मर्यादित आसनक्षमता असून नागरिकांनी वेळेपूर्वी उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.

कार्यक्रमात तुकाराम मुंढे यांच्या प्रशासनातील अनुभवांसह भ्रष्टाचारमुक्त व्यवस्था, आरोग्यविषयक जनजागृती आणि नागरिक-प्रशासन संवाद या विषयांवर विचारमंथन होणार असल्याने या कार्यक्रमाकडे पिंपरी-चिंचवडकरांचे लक्ष लागले आहे.

Share.
Leave A Reply

Please Join Our WhatsApp Group
Exit mobile version