Spread the love

 

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज)  – शिवसेना मध्यवर्ती कार्यालय, शिवसेना भवन आकुर्डी येथे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी शहरप्रमुख चेतन पवार यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.

या कार्यक्रमास पक्षाचे पदाधिकारी, उपजिल्हाप्रमुख, विभागप्रमुख, उपविभागप्रमुख, शाखाप्रमुख तसेच शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी उपस्थित मान्यवरांनी स्वातंत्र्यसैनिकांच्या त्यागाचे स्मरण करून देशाच्या अखंडता, लोकशाही मूल्ये आणि संविधानाचे रक्षण करण्याचा संकल्प केला.

कार्यक्रमाला जिल्हा संघटिका अनिता तुतारे , जिल्हा संघटिका वैशाली घोडके,   ज्योती भालके, उपजिल्हा प्रमुख रोमी संधू, अशोक वाळके, कार्यालयीन सचिव ज्ञानेश्वर शिंदे, ‘पांडुरंग’ विभागाचे उपशहरप्रमुख, तसेच विविध विभागांचे प्रमुख व पदाधिकारी उपस्थित होते. यामध्ये नाना सोनावणे, विवेक शिंदे, संदीप भालके, किरण दळवी , अमित  निंबाळकर , शैलेश मोरे, भरत साळुंके, उपविभागप्रमुख  योगेश राऊत,  सतीश मरळ, शाखा प्रमुख  शिवाजी शेळके,  दीपक भक्त,  वैभव शिंदे, कल्याण कोकणे, विवेक भिसे, सतीश मरळ, श्रीमंत गिरी, पार्थ गुरव, नाना सोनार, गिरीश महाडिक, सुमित निकाळजे, ज्योती भालके, उपशहर  प्रमुख वैशाली काटकर, चिंचवड विधानसभा संघटिका कलावती नाटेकर, तसलीम शेख, संघटिका वंदना खंडागळे, रत्नमाला नवघीरे, सुजाता गायकवाड , दीपक  भक्त, सईदेव आदींचा समावेश होता.

तसेच विविध विभागांचे पदाधिकारी, शाखाप्रमुख व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित राहून स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमात सहभागी झाले. देशभक्तीपर वातावरणात झालेल्या या कार्यक्रमाने शिवसेना भवन परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.

Share.
Leave A Reply

Please Join Our WhatsApp Group
Exit mobile version