Spread the love

 

पिंपरी,  (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) –  नव्याने स्थापन झालेल्या मोरवाडी येथील जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाच्या आवारात भारताचा ८० वा स्वातंत्र्यदिन मोठ्या उत्साहात व देशभक्तीपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे आयोजन पिंपरी चिंचवड ॲडव्होकेट्स बार असोसिएशनच्या वतीने करण्यात आले होते.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश श्रीमती एस. एस. नायर या होत्या. त्यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. मोरवाडी येथे जिल्हा न्यायालय स्थापन झाल्यानंतर प्रथमच जिल्हा न्यायाधीशांच्या हस्ते ध्वजारोहणाचा मानाचा कार्यक्रम पार पडल्याने या सोहळ्यास विशेष महत्त्व प्राप्त झाले.

यावेळी जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश श्री. एस. एन. यादव, श्री. कुलकर्णी साहेब, वरिष्ठ दिवाणी न्यायाधीश श्री. पि. एस. कुलकर्णी, श्री. सुपेकर तसेच दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर न्यायाधीश श्रीमती. एस. एस. चव्हाण, श्री. अल अमुदी ए. के., श्री. एस. एन. गवळी, श्रीमती टी. एस. महाडिक, श्री. जे. जे. इनामदार, श्रीमती ए. आय. आवटी, श्री. के. के. वाघमारे, श्री. आर. आर. शेरेकर आणि श्रीमती जी. जी. औटी उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरुवात भारतमातेच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली. त्यानंतर ध्वजारोहण, राष्ट्रगीत व महाराष्ट्र गीताचे सामूहिक गायन करण्यात आले. यावेळी जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश श्रीमती एस. एस. नायर यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करत स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या व न्यायव्यवस्थेच्या कार्यातील राष्ट्रसेवेचे महत्त्व अधोरेखित केले.

पिंपरी चिंचवड ॲडव्होकेट्स बार असोसिएशनचे माजी अध्यक्ष ॲड. सतीश गोरडे यांनी बारच्या वतीने प्रातिनिधिक स्वरूपात उपस्थित सर्वांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या.

या प्रसंगी उपस्थित सर्व माननीय न्यायाधीश तसेच सहाय्यक सरकारी अभियोक्ता यांचा पिंपरी चिंचवड ॲडव्होकेट्स बार असोसिएशनच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. कार्यक्रमास मोठ्या संख्येने वकीलबंधू-भगिनी उपस्थित होते.

स्वातंत्र्यदिनानिमित्त आयोजित या सोहळ्यामुळे न्यायालय परिसरात देशभक्तीचे आणि राष्ट्रीय एकात्मतेचे वातावरण निर्माण झाले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ॲड. मंगेश खराबे यांनी केले तर उपस्थितांचे आभार बार असोसिएशनचे सचिव ॲड. उमेश खंदारे यांनी मानले.

Share.
Leave A Reply

Please Join Our WhatsApp Group
Exit mobile version