
– राष्ट्रीय एकात्मता, बंधुभाव आणि देशाप्रती जबाबदारी जपण्याचा नागरिकांनी केला संकल्प
चिंचवड, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – देशाच्या स्वातंत्र्याचा अभिमान प्रत्येक नागरिकाच्या मनात कायम जागा राहावा आणि देशाच्या प्रगतीसाठी प्रत्येकाने आपापल्या परीने योगदान द्यावे, असा देशभक्तीचा संदेश चिंचवडगावातील रस्टन कॉलनी येथे स्वातंत्र्य दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमातून देण्यात आला. तिरंग्याखाली एकत्र येत विविध समाजघटकांनी राष्ट्रीय एकात्मता, बंधुभाव आणि देशाप्रती असलेली जबाबदारी जपण्याचा संकल्प केला.
रस्टन कॉलनी येथे अध्यक्ष डी. एम. पवार यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी विलास कंक, बाळासाहेब नवले, सुभाष मालुसरे, अनंत शिरसागर, गणेश ओगले, सुमित कांबळे, आर. जी. पाटील, गुलाब मुलाणी, फिरोज खान, महेश कुंभार, मोहन वायकुळे, असलम शेख आदी मान्यवर उपस्थित होते. नागरिकांनी तिरंग्याला सलाम करून स्वातंत्र्यसैनिकांच्या बलिदानाला अभिवादन केले.
स्वातंत्र्य दिनानिमित्त चिंचवडगावातील रस्टन कॉलनी, अहिर सुवर्णकार समाज आणि शिवसेना वेताळनगर शाखा या तीन ठिकाणी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. तिन्ही ठिकाणी उत्साहपूर्ण आणि देशभक्तीच्या वातावरणात ध्वजारोहण करण्यात आले.
वेताळनगर शाखेत जिल्हा संघटक संतोष सौंदणकर, नगरसेवक अनंत कोऱ्हाळे, शाखाप्रमुख मजीद शेख, शिवाजी तांबे, रफिक बेग, राजू मासाळकर, सपना बनसोडे, कलावती नाटेकर, माया कुलथे, यास्मिन पठाण, रूपाली तेलंगी, रेखा गायकवाड, अंजना करांडे, अश्विनी धावरे, राणी काळभोर, शितल काशीद आदी उपस्थित होते. कार्यक्रमानंतर विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप करण्यात आले.
अहिर सुवर्णकार समाज पिंपरी-चिंचवड येथे समाजाचे अध्यक्ष भगवान वानखेडे, उपाध्यक्ष संतोष सौंदणकर, सचिव गणेश सोनार, खजिनदार शिवाजी सोनार, दीपक सोनार, सुनील निकुंभ, कैलास पैठणकर, प्रमोद काशीदकर, गणेश देवरे महिला प्रमुख स्मिता सोनार, अनिता सोनार यांच्यासह समाज बांधव उपस्थित होते.
*देशभक्ती कृतीतून व्यक्त करुयात : संतोष सौंदणकर*
स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी असंख्य स्वातंत्र्यसैनिकांनी केलेल्या त्यागाचे स्मरण ठेवून देशाच्या एकता, अखंडता आणि प्रगतीसाठी प्रत्येक नागरिकाने योगदान देणे आवश्यक आहे. तिरंगा हा केवळ राष्ट्रध्वज नसून तो देशाच्या अस्मितेचे आणि एकतेचे प्रतीक आहे. त्यामुळे देशभक्ती मनात ठेवून ती कृतीतून व्यक्त करु, असा संकल्प करुयात, असे आवाहन शिवसेना जिल्हा संघटक संतोष सौंदणकर यांनी उपस्थितांना केले.
या प्रसंगी अहिर सुवर्णकार समाज यांच्या वतीने देशभक्तिपर गीतांचा कार्यक्रम आयोजीत केला.
