Spread the love

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी-चिंचवड महानगरपालिका सेवकांची सहकारी पतसंस्था मर्यादितच्या सन २०२३-२०२८ या पंचवार्षिक निवडणुकीनंतर १२ ऑगस्ट रोजी झालेल्या संचालक मंडळाच्या सभेत नवीन पदाधिकाऱ्यांची एकमताने निवड करण्यात आली.
पतसंस्थेच्या चेअरमनपदी विजय संभाजी मुंडे, व्हा. चेअरमनपदी चंद्रकांत संपतराव भोईर, सेक्रेटरीपदी भास्कर मारुती फडतरे तर खजिनदारपदी विश्वनाथ जगन्नाथ लांडगे यांची निवड झाली. निवडणूक निर्णय अधिकारी तथा सहाय्यक सहकारी जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, पुणे शहर-३ गजेंद्र एल. सवाईकर यांच्या अध्यक्षतेखाली ही निवड प्रक्रिया पार पडली.

यावेळी पिंपरी-चिंचवड मनपा कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष शशिकांत उर्फ बबनराव झिंजुर्डे यांची प्रमुख उपस्थिती होती. नवनिर्वाचित पदाधिकारी व संचालक मंडळाने सभासदांना तत्पर सेवा, पारदर्शक व्यवहार आणि संस्थेची आर्थिक प्रगती वाढविण्याचा संकल्प केला.

संस्थेच्या आर्थिक उलाढालीत सातत्याने वाढ झाली असून, संस्थेला सलग ‘अ’ वर्ग दर्जा मिळत आहे. सभासदांच्या हितासाठी ठेवींवर आकर्षक व्याजदर, कर्ज सुविधा तसेच विविध आर्थिक लाभ देण्याचे धोरण संस्थेने कायम ठेवले आहे. नवीन पदाधिकाऱ्यांच्या निवडीबद्दल सभासद व पदाधिकाऱ्यांकडून अभिनंदन करण्यात आले.

Share.
Leave A Reply

Please Join Our WhatsApp Group
Exit mobile version