
अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त वसंतराव कुदळे यांचा अभिष्टचिंतन सोहळा संपन्न
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी चिंचवड महापालिकेचे सेवानिवृत्त प्रशासन अधिकारी आणि इंद्रायणी बँकेचे संचालक वसंतराव बाबुराव कुदळे हे प्रशासन व समाजकार्यातील आदर्श व्यक्तिमत्व आहेत. त्यांचे मार्गदर्शन नव्या पिढीला दीपस्तंभाप्रमाणे मार्गदर्शक ठरेल असे ज्येष्ठ माजी नगरसेवक वसंत नाना लोंढे यांनी सांगितले.
पिंपरी गावातील रहिवासी वसंतराव कुदळे यांच्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त ‘रागा पॅलेस’ येथे स्नेहमेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी माजी नगरसेवक वसंत नाना लोंढे, इंद्रायणी सहकारी बँकेचे संस्थापक अध्यक्ष एस. बी. चांडक, माजी नगरसेवक हरेश आसवानी, रंगनाथ कुदळे यांच्या हस्ते मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी नगरसेवक प्रियंका कुदळे, निकिता कदम, माजी नगरसेवक शांती सेन, चंद्रकांत भोळे, सुरेश म्हेत्रे, राजेंद्र गावडे, इंद्रायणी बँकेचे उपाध्यक्ष महेश चांडक, संचालक सुरेश जुमानी, जयहिंद बँकेचे संचालक बापू आल्हाट, ओबीसी संघर्ष समितीचे अध्यक्ष आनंदा कुदळे, संत सावता सेवक ट्रस्टचे अध्यक्ष रामभाऊ कुदळे, पिंपरी चिंचवड हॉटेल असोसिएशनचे अध्यक्ष गणेश कुदळे, सकाळ माध्यम समूह जाहिरात व्यवस्थापक मिलींद भुजबळ, माजी सहायक आरोग्य अधिकारी प्रकाश जवळकर, दिशा सोशल फाऊंडेशनचे उपाध्यक्ष संतोष बाबर, संचालक भरत आल्हाट, ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष वसंत तावरे, युवा कार्यकर्ते ऋषिकेश संजोग वाघेरे, योग वर्गचे कामता प्रसाद पटेल, निमगाव दुडेचे सरपंच रामभाऊ गायकवाड, सामाजिक कार्यकर्त्या शारदा मुंडे आदी विविध क्षेत्रातील नागरिक उपस्थित होते.
शिक्षण, प्रशासन, सहकार, व्यापार, समाजकार्य, अध्यात्म अशा विविध क्षेत्रात वसंत कुदळे यांचा मोठा जनसंपर्क आहे. त्यांना निरोगी, निरामय, दीर्घायुष्य लाभो अशा शुभेच्छा एस. बी. चांडक यांनी दिल्या. यावेळी अनेक मान्यवरांनी जुन्या स्मृतींना उजाळा देत वसंतराव कुदळे यांच्या विषयी कृतज्ञता व्यक्त केली.
यावेळी ‘सरगम ग्रूप’च्या वतीने संगीतमय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. स्वागत विक्रम कुदळे व विशाल कुदळे, सूत्रसंचालन श्रीकांत कदम आणि शिक्षण मंडळाच्या माजी सभापती गिरीजादेवी प्रवीण कुदळे यांनी आभार मानले.

