Spread the love

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – दुर्गा ब्रिगेड संघटना महाराष्ट्र राज्य व एम.एम.सी शंकरराव चव्हाण लॉ कॉलेज पुणे तर्फे संयुक्त युवती संवाद हा समारंभ झाला. या वेळी मराठवाडा मित्र मंडळ कॉलेजमध्ये मध्ये विद्यार्थिनींसाठी दुर्गा ब्रिगेड संघटनेतर्फे तक्रार पेटी बसवण्यात आली.

यावेळी प्रमुख मार्गदर्शक पोलीस उप आयुक्त  संदीप सिंग गिल्ल साहेब,कार्यकारी अध्यक्ष एम.एम सी कॉलेज प्राचार्य  भाऊसाहेब जाधव  ,डेक्कन पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक  विपिन हसबनीस , इंडस्ट्रीज असोसिएशनचे अध्यक्ष  अभय भोर ,ए.पी.आय वर्षा शिंदे, पोलीस निरीक्षक साळुंखे  , शंकरराव चव्हाण लॉ कॉलेज कॉलेजच्या प्राचार्य डॉ क्रांती देशमुख , कार्यक्रमाचे आयोजक दुर्गा ब्रिगेड संघटनेचे अध्यक्ष कु दुर्गा भोर , श्री भालेराव व अन्य अधिकारी आणि सर्व युवती मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

यावेळी पोलीस उप आयुक्त  संदीप सिंग गिल्ल  यांनी विद्यार्थिनींनी शारीरिक दृष्ट्या तंदुरुस्त राहून व्यायामाबरोबर आपल्या पौष्टिक आहार सुद्धा घेणे गरजेचे आहे आणि युवतींना कोणतीही अडचण आल्यास त्यांनी त्वरित नजीकच्या पोलीस स्टेशन दामिनी पथक यांना संपर्क साधल्यास त्यावर त्वरित समाधान दिले जाईल आणि विद्यार्थ्यांना अनेक विषय मार्गदर्शन केले युवतींनी संवाद सादर पोलीस उपायुक्त गिल साहेब यांना काही प्रश्न विचारले तसेच दामिनी पथका संदर्भात एपीआय वर्ष शिंदे यांनी विद्यार्थिनींना माहिती दिली संस्थेचे कार्यकारी अध्यक्ष श्री जाधव सर यांनी या उपक्रमाचे कौतुक केले आणि पुढील काळामध्ये कॉलेज कडून विद्यार्थिनी संदर्भात दुर्गा ब्रिगेड पोलीस आयुक्तालय यांना पूर्ण सहकार्याची भूमिका घेऊन मुलींना सर्व प्रकारे सहकार्याची भूमिका घेऊन या अभियानास पाठिंबा दिला कु दुर्गा भोर यांनी विद्यार्थिनींना स्व प्रशिक्षणार्थ प्रशिक्षण लवकरच काळामध्ये कॉलेजमध्ये चालू करणार असून त्यामध्ये विद्यार्थिनींनी सहभाग घ्यावा आणि विद्यार्थिनींना कोणतीही समस्या अडचण जाणवल्यास आपल्या समस्या दुर्गा ब्रिगेड संघटने कडे मांडाव्यात जेणेकरून विद्यार्थिनींना शिक्षण घेताना कोणतीही अडचण जाणवणार नाही आणि निर्भयपणे शिक्षण घेता येईल श्री अभय भोर यांनी विद्यार्थिनींशी संवाद साधून विद्यार्थिनींच्या समस्या जाणून घेतल्या आणि या समस्या त्वरित सोडविण्यात येतील सर्व विद्यार्थिनींनी स्वप्रशिक्षणार्थ तसेच तर शैक्षणिक क्षेत्रांमध्ये कोणतीही समस्या आल्यास इंडस्ट्रीज असोसिएशन तर्फे सहकार्याची भूमिका असेल असे सांगितले तसेच वरिष्ठ पोलीस निरीक्षक विपिन हसबनीस  व प्राचार्या क्रांती देशमुख यांनी मोलाचे मार्गदर्शन केले यावेळी अनेक विद्यार्थ्यांनी कायद्यासंदर्भात तसेच छेडछाडी संदर्भात प्रसंग उद्भवल्यास कोणती भूमिका घ्यावी या संदर्भात प्रश्न विचारणा केली त्यावर पोलीस उपायुक्त गिल साहेब आणि मान्यवरांनी त्या प्रश्नांचे समाधान केले मोठ्या संख्येने युवा आणि युवती याप्रसंगी उपस्थित होत्या

Share.
Leave A Reply

Please Join Our WhatsApp Group
Exit mobile version