
कासारवाडी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – सामाजिक व धार्मिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या श्री ऑल इंडिया श्वेतांबर जैन कॉन्फरन्सच्या महिला शाखेच्या माजी राष्ट्रीय उपाध्यक्षा तथा विद्यमान राष्ट्रीय मार्गदर्शक सौ. लता पगारिया यांना ‘राजमाता जिजाऊ आदर्श माता’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
आंतरराष्ट्रीय मानवाधिकार राजदूत संघटना, जागतिक शांती परिषद आणि भारतीय स्वयंसेवी संस्था महासंघ यांच्या संयुक्त विद्यमाने पुणे येथील पत्रकार भवन येथे आयोजित पुरस्कार सोहळ्यात नागपूर विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. एस. एम. पठाण, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे माजी अधिष्ठाता प्राचार्य डॉ. सुधाकर जाधव, मानवाधिकार राजदूत संघटनेचे अध्यक्ष अविनाश सकुंडे, भारतीय स्वयंसेवी संस्था महासंघाचे अध्यक्ष डॉ. संजय कांबळे, प्रा. गोरख साठे, प्रा. सुरेखा कटारिया आदी मान्यवरांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
धार्मिक व सामाजिक क्षेत्रातील त्यांचे दीर्घकालीन योगदान तसेच त्यांच्या मुलांनी – सुप्रिया छल्लाणी, श्रेयस पगारिया आणि दर्शना पारख यांनी आपल्या-आपल्या क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्याचा गौरव म्हणून हा पुरस्कार देण्यात आल्याचे संयोजकांनी सांगितले.
या सन्मानाबद्दल लता पगारिया यांचे विविध सामाजिक, धार्मिक व शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांकडून अभिनंदन करण्यात येत आहे.

