
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी-चिंचवड शहरावर लागू असलेली १५ टक्के पाणी कपात तात्काळ रद्द करून नागरिकांना नियमित व पुरेसा पाणीपुरवठा करावा, अशी मागणी भाजपा संत तुकाराम नगर–कासारवाडी–खराळवाडी मंडळ एस.सी. मोर्चा अध्यक्ष निलेश राजू आढाव यांनी दिलेल्या प्रसिद्धीपत्रकातून केली आहे.
दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की, पवना धरण १०० टक्के भरलेले असताना शहरावर पाणी कपात कायम ठेवण्याचे कोणतेही ठोस कारण नसल्याचे त्यांनी म्हटले आहे. या निर्णयामुळे नागरिकांना, विशेषतः महिला, ज्येष्ठ नागरिक आणि विद्यार्थ्यांना मोठा त्रास सहन करावा लागत असून अनेक भागांत कमी दाबाने व अनियमित पाणीपुरवठा होत असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत.
जनहिताचा विचार करून महापालिका प्रशासनाने १५ टक्के पाणी कपात तात्काळ मागे घ्यावी आणि शहरातील सर्व भागांत सुरळीत व समान पाणीपुरवठा सुरू करावा, अशी मागणी निलेश राजू आढाव यांनी केली.

