Spread the love

पुणे, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पुणे व पिंपरी-चिंचवडमधील पत्रकार बांधवांनी आज बोपोडी येथील सेंटरला अचानक भेट देऊन आध्यात्मिक आणि सामाजिक उपक्रमांचा अनुभव घेतला.

यावेळी सेंटरच्या संचालिका लक्ष्मी बहन जी यांनी पत्रकारांचे स्वागत करून विद्यालयाचा परिचय करून दिला. त्यांनी राजयोग मेडिटेशनचे महत्त्व, मन:शांती आणि सकारात्मक विचारसरणी याबद्दल सविस्तर माहिती दिली.

कार्यक्रमाचा मुख्य उद्देश “वर्तमान समय: 10 कोटी नशामुक्त अभियान” या विषयावर जागरूकता निर्माण करणे हा होता. लक्ष्मी बहन जी यांनी व्यसनमुक्त समाजासाठी सुरू असलेल्या या अभियानाची माहिती दिली आणि उपस्थित सर्व पत्रकारांकडून नशामुक्त राहण्याची प्रतिज्ञा करून घेतली.

या संवादात पत्रकारांनी आपल्या भावना मोकळेपणाने व्यक्त केल्या. मेडिटेशनमुळे तणाव कमी होतो आणि समाजात सकारात्मक संदेश पोहोचवण्यासाठी माध्यमांची भूमिका महत्त्वाची आहे, असे मत अनेकांनी मांडले.

माउंट आबू येथील मीडिया कॉन्फरन्ससाठी जाणार
विशेष म्हणजे या सर्व पत्रकार बांधवांना 9 ते 13 सप्टेंबर दरम्यान माउंट आबू येथे आयोजित होणाऱ्या *मीडिया कॉन्फरन्स* साठी निमंत्रित करण्यात आले आहे. तिथे देशभरातील माध्यम प्रतिनिधी एकत्र येऊन “सकारात्मक पत्रकारिता” या विषयांवर चर्चा करणार आहेत.

बोपोडी सेंटरच्या या उपक्रमामुळे पत्रकारांमध्ये उत्साहाचे वातावरण होते. समाजाला व्यसनांच्या विळख्यातून बाहेर काढण्यासाठी माध्यमे पुढाकार घेतील, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला. या मीडिया कॉन्फरन्सचे पुण्याचे नेतृत्व, ब्रह्माकुमारीज पुणे जिल्हा मीडिया समन्वयक बीके सोमनाथ भाई हे करत आहेत.

Share.
Leave A Reply

Please Join Our WhatsApp Group
Exit mobile version