Spread the love

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – कासारवाडी येथील आचार्य आनंद ऋषीजी इंग्लिश मीडियम स्कूलच्या वतीने आचार्य आनंद ऋषीजी महाराज यांच्या जन्मदिन आणि गुरुपौर्णिमा हा कार्यक्रम संयुक्तरित्या संपन्न करण्यात आला.

यावेळी हजारो भक्तांचे गुरू आचार्य आनंद ऋषीजी या महान संतांविषयी अनेक विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले संस्थेचे विश्वस्त विलास कुमार पगारिया , मुख्याध्यापिका सुलभा मुंगी, उपमुख्याध्यापिका सुवर्णा शिंदे तसेच संस्थेचे अध्यक्ष डॉ अशोक कुमार पगारिया यांनी आचार्य आनंद ऋषीजी यांच्या जीवनावर आपले विचार व्यक्त केले.

यावेळी बोलताना प्रा अशोककुमार पगारिया म्हटले की, आचार्य सम्राट आनंद ऋषी महाराज हे केवळ जैनांचे नाही तर सर्व जन समाजाचे संत होते त्यांनी आपल्या सबंध जीवनभर संघटन, साधना ,शिक्षण, आणि संस्कार याविषयी समाजाचे प्रबोधन केले त्यांच्या प्रेरणेने अनेक संस्थांनी विद्यालये, हॉस्पिटल्स आणि समाजसेवेचे विविध उपक्रम सुरू केले. आचार्य यांनी जैन समाजाच्या अनेक संप्रदायांमध्ये संघटन करून एकी प्रस्थापित केली त्यामुळे त्यांना सर्व संप्रदायाचे आचार्य म्हणून समाजाने आणि साधुसंतांनी नियुक्त केले. त्यांच्या विविध क्षेत्रातील कार्याचा गौरव म्हणून महाराष्ट्र राज्याचे त्यावेळचे मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांनी 1975 साली त्यांना राष्ट्रसंत हा किताब देऊन त्यांचा गौरव केला.

अशा या महान राष्ट्रसंतांच्या जन्मदिनी आचार्य आनंद ऋषीजी स्कूल चे विश्वस्त ,अध्यापक आणि विद्यार्थी यांच्या वतीने वन्दन‌ नमन‌ आणि अभिवादन करण्यातआले. यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन .रूतूजा वेदपाठक. यांनी केले ,रश्मी देवरुखकर यांनी आभार मानले व शाळेतील इतर सर्व शिक्षकांनी कार्यक्रमाचे संयोजन केले.

Share.
Leave A Reply

Please Join Our WhatsApp Group
Exit mobile version