Spread the love

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – भोसरी एमआयडीसी परिसरात दुर्गा ब्रिगेड संघटनेतर्फे छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात साजरी करण्यात आली याप्रसंगी उद्योजक कामगार महिला आणि युवा वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळीन दुर्गा ब्रिगेड संघटनेतर्फे छत्रपती शिवरायांची आरती घेण्यात आली. तसेच सर्व ठिकाणी पेढे वाटून उत्साहात जयंती साजरी करण्यात आली.

यावेळी इंडस्ट्रीज असोसिएशनचे अध्यक्ष अभय भोर यांच्या शुभहस्ते आरती करण्यात आली आणि प्रत्येकाला आरतीचा मान देण्यात आला याप्रसंगी उद्योजक जसबिंदर सिंग ज्येष्ठ नागरिक संघ सदाशिव पाटील, शिवदास महाजन , अल्पेश मुरकर दुर्गा ब्रिगेड अध्यक्ष दुर्गा भोर ,दुर्गा ब्रिगेडच्या उपाध्यक्ष गौरी सांडभोर दुर्गा ब्रिगेडच्या खजिनदार जयश्री साळुंखे तसेच ब्रिगेडच्या सहसचिव हेमलता घुले , अवंतिका भोर हिने मर्दानी खेळाचे प्रात्यक्षिक केले इतर कार्यकर्ते उपस्थित होते

Share.
Leave A Reply

Please Join Our WhatsApp Group
Exit mobile version