
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या भव्य रक्तदान शिबिराला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत मोठ्या संख्येने रक्तदान केले. समाजसेवेचा संदेश देणाऱ्या या उपक्रमातून “रक्तदान हेच श्रेष्ठ दान” हा विचार अधिक दृढ झाला.
या प्रसंगी विधानपरिषद आमदार अमित गोरखे,उपमहापौर शर्मिला बाबर, नगरसेविका गीता आफळे, नगरसेवक अमित गावडे, उमेश कुलकर्णी, अमोल भोईटे, उद्योजक निकेश ताकवणे, विनायक आवसरे तसेच उद्योजक अविनाश काचोळे यांची प्रमुख उपस्थिती होती.
याशिवाय सागर दिघे, भूषण बाबर, रोहन बाबर, प्रमोद पांडे, अविनाश भालेकर, दीपक गावंदरे, सुशांत भिसे, सागर सोनावले, संदेश कुरकुटे, सचिन कुलकर्णी, महेश मोरे, योगेश भामरे आदी मान्यवरांनी उपस्थित राहून रक्तदाते आणि स्वयंसेवकांचा उत्साह वाढविला.
या उपक्रमाचे संयोजक राजेंद्र बाबर तसेच उपमहापौर शर्मिलाताई राजेंद्र बाबर यांच्या मार्गदर्शनाखाली शिबिराचे यशस्वी आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाच्या नियोजनासाठी अभय प्रभुणे, राजेश कडू आणि राहुल तानवडे यांनी घेतलेल्या अथक परिश्रमाचे सर्व स्तरांतून कौतुक करण्यात आले.
“रक्तदान म्हणजे जीवनदान” या भावनेतून आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमामुळे अनेक गरजू रुग्णांना जीवनदान मिळण्यास मदत होणार असून समाजात मानवतेचा आणि सेवाभावाचा प्रेरणादायी संदेश देण्यात यश आले. आयोजकांनी भविष्यातही अशा समाजोपयोगी उपक्रमांमध्ये नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन केले.
