Spread the love

महापौर रवि लांडगे यांच्या हस्ते पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेत पुष्पहार अर्पण करून अभिवादन

पिंपरी,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महाराष्ट्राच्या विकासासाठी दूरदृष्टी ठेवून पायाभूत सुविधांसह विविध क्षेत्रांत महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. राज्याच्या सर्वांगीण प्रगतीसाठी त्यांनी राबविलेल्या विविध विकासात्मक उपक्रमांमुळे आधुनिक आणि सक्षम महाराष्ट्र घडविण्यात मोलाची भूमिका बजावली तसेच पिंपरी-चिंचवड शहराच्या विकासातही त्यांचे योगदान महत्त्वपूर्ण असल्याचे प्रतिपादन महापौर रवि लांडगे यांनी व्यक्त केले.

महानगरपालिकेच्या वतीने महाराष्ट्र राज्याचे दिवंगत उप मुख्यमंत्री अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त त्यांना अभिवादन करण्यात आले. पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय इमारतीमधील त्यांच्या प्रतिमेस महापौर रवि लांडगे व आमदार अमित गोरखे यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले,त्यावेळी ते बोलत होते.
अभिवादन प्रसंगी आयुष्यमान भारत योजनेचे महाराष्ट्र प्रदेश प्रमुख डॉ. ओमप्रकाश शेटे, आमदार उमा खापरे, उपमहापौर शर्मिला बाबर, सत्तारूढ पक्षनेते प्रशांत शितोळे, स्थायी समिती सभापती अभिषेक बारणे, माजी महापौर योगेश बहल, डाॅ.वैशाली घोडेकर, अतिरिक्त आयुक्त कुलदीप जंगम,विक्रांत बगाडे, महिला व बालकल्याण समिती सभापती राणी पठारे, शिवसेनेचे गटनेते विश्वजीत बारणे,नगरसदस्य शत्रुघ्न (बापू) काटे,जितेंद्र ननावरे, नगरसदस्या अनुराधा गोरखे, सुप्रिया चांदगुडे,वर्षा जगताप, मनिषा लांडे, पिंपरी चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाचे माजी अध्यक्ष सदाशिव खाडे, माजी नगरसदस्य बबनराव गाढवे,माजी नगरसदस्या सीमा सावळे,आशा शेंडगे, सह आयुक्त मनोज लोणकर, मुख्य सुरक्षा अधिकारी उदय जरांडे, विशेष अधिकारी किरण गायकवाड, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक,कर्मचारी महासंघाचे अभिषेक फुगे तसेच विविध विभागातील अधिकारी,कर्मचारी व नागरिक उपस्थित होते.

यावेळी उपस्थित मान्यवरांनी देखील दिवंगत माजी उप मुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले तसेच त्यांच्या दूरदृष्टीपूर्ण नेतृत्वामुळे आणि विकासाभिमुख कार्यामुळे पिंपरी-चिंचवड शहराच्या प्रगतीला नवी दिशा मिळाली असून, त्यांचे कार्य भावी पिढ्यांसाठी प्रेरणादायी राहील, अशा भावना देखील व्यक्त केल्या.

Share.
Leave A Reply

Please Join Our WhatsApp Group
Exit mobile version