Spread the love
रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त विद्यार्थी विकासासाठी विविध उपक्रमांचे आयोजन
पिंपरी,  (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – शिक्षण प्रसारक मंडळीच्या यमुनानगर, निगडी येथील इंग्रजी व मराठी माध्यम शाळेत संस्थेच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त दोन दिवसीय भव्य प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे.
 शनिवारी (दि.१७) सकाळी १० वाजता पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष प्रा. डॉ. दिगंबर दुर्गाडे यांच्या हस्ते या प्रदर्शनाचे उद्घाटन होणार आहे. या प्रदर्शनास सर्वांना विनामूल्य प्रवेश असून या ठिकाणी लावण्यात आलेल्या विविध दालनास पालक, विद्यार्थी व परिसरातील नागरिकांनी भेट देऊन मनसोक्त खरेदीचा आनंद लुटावा असे आवाहन शाळा समितीचे अध्यक्ष ॲड. दामोदर भंडारी यांनी केले आहे.
याठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज यांची प्रेरणादायी पुस्तके, गोविज्ञान व आधारित वस्तू आणि त्यावरील पुस्तके तसेच विविध प्रकारची झाडे यांचे प्रदर्शन व विक्री दालने थाटण्यात आली आहेत. विद्यार्थी व प्रेक्षकांसाठी खाऊ गल्लीत विविध खाद्यपदार्थाचे स्टॉल उभारण्यात आले आहेत. रविवारी सायंकाळी सहा वाजता या प्रदर्शनाचा समारोप होणारा आहे अशी माहिती शिक्षण प्रसारक मंडळीच्या वतीने प्रसिद्धीस देण्यात आली आहे.
Share.
Leave A Reply

Please Join Our WhatsApp Group
Exit mobile version