Spread the love

‘माऊली’च्या चरणी उपमुख्यमंत्री सुनेत्रावहिनी अजितदादा पवार; वारकऱ्यांसोबत सहभोजन करत अनुभवला भक्तीचा अविस्मरणीय सोहळा

सासवड, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – अखंड हरिनामाच्या गजरात आणि भक्तिमय वातावरणात राज्याच्या उपमुख्यमंत्री श्रीमती सुनेत्रावहिनी अजितदादा पवार यांनी आज सासवड येथील पालखितळावर जाऊन जगद्गुरू संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखीचे दर्शन घेतले. ‘माऊली’च्या चरणी नतमस्तक होत त्यांनी राज्यातील जनतेच्या सुख-समृद्धीची प्रार्थना केली.

वारीच्या समतेच्या आणि सेवाभावाच्या परंपरेला अभिवादन करत सुनेत्रावहिनी यांनी वारकरी आणि पालखी प्रमुखांसमवेत जमिनीवर बसून सहभोजन केले. यावेळी त्यांनी वारकऱ्यांशी मनमोकळा संवाद साधत त्यांच्या वारीतील अनुभव जाणून घेतले. भक्ती, समता आणि प्रेमाचा संदेश देणाऱ्या या पवित्र परंपरेचा त्यांनी आत्मीयतेने अनुभव घेतला.

यावेळी पुणे ग्रामीणचे पोलिस अधीक्षक श्री संदीप सिंह गिल, पुणे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष श्री वीरधवल जगदाळे, तसेच अन्य पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने वारकरी उपस्थित होते. संपूर्ण परिसर “ज्ञानोबा-तुकाराम”च्या जयघोषाने आणि भक्तिरसाने भारावून गेला.

Share.
Leave A Reply

Please Join Our WhatsApp Group
Exit mobile version