Spread the love

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी चिंचवड महानगरपालिका हद्दीतील मोशी येथील कचरा डेपो येथे बुधवारी घडलेली घटना ही अत्यंत दुर्दैवी आहे. २४ तास उलटून गेले तरी येथील बचाव कार्य अद्यापही सुरू आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे अग्निशामक दल, आपत्ती व्यवस्थापन विभाग, एनडीआरएफ चे जवान या कचऱ्याच्या डोंगराखाली अडकलेल्या कर्मचाऱ्यांचे प्राण वाचवण्यासाठी
अहोरात्र प्रयत्न करीत आहेत. या घटनेमुळे उपस्थित झालेले सुरक्षिततेचे बाबतचे विषय आणि आजूबाजूच्या पर्यावरणाचे प्रश्न याचा पूर्ण तपास झाला पाहिजे. याची सखोल चौकशी करण्यासाठी एसआयटी स्थापन करावी. तसेच या कचरा डेपो बाबत परिसरातील नागरिकांच्या असलेल्या सर्व तक्रारींचे निवारण होणे आवश्यक आहे. भविष्यात अशा घटना घडू नये कोणाचा जीव जाऊ नये यासाठी सखोल चौकशी होणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन माजी खासदार अमर साबळे यांनी केले.

गुरुवारी दुपारी माजी खासदार अमर साबळे यांनी माजी नगरसेवक माऊली थोरात, कामगार नेते हनुमंत लांडगे आणि भाजपच्या कार्यकर्त्यांसमवेत घटनास्थळी भेट देऊन माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधला.

Share.
Leave A Reply

Please Join Our WhatsApp Group
Exit mobile version