Spread the love

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – मोशी कचरा डेपो येथे कचऱ्याचा मोठा ढिग शेजारील इमारतीवर कोसळून झालेल्या दुर्घटनेनंतर नगरसेविका सुलभा रामभाऊ उबाळे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदनाद्वारे संबंधित अधिकाऱ्यांवर कठोर कारवाईची मागणी केली आहे.

सुलभा उबाळे यांनी दिलेल्या निवेदनात पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या पर्यावरण विभागावर गंभीर आरोप करत, पर्यावरण विभागाचे प्रमुख संजय कुलकर्णी यांना या दुर्घटनेस जबाबदार धरून त्यांना तात्काळ निलंबित करण्याची मागणी केली आहे. तसेच पर्यावरण विभागाच्या कामकाजाची सखोल चौकशी करून भ्रष्टाचार उघडकीस आणण्याचीही मागणी त्यांनी केली आहे.

मोशी कचरा डेपोतील वेस्ट-टू-एनर्जी प्रकल्प अनेक दिवसांपासून बंद असल्याने कचऱ्याचे ढिग वाढत गेले असून, बायोमायनिंगच्या विविध टप्प्यांसाठी शेकडो कोटी रुपयांच्या निविदा काढूनही परिस्थितीत सुधारणा झालेली नसल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे.

याशिवाय मोशी कचरा डेपोमध्ये राबविण्यात आलेल्या अनेक प्रकल्पांवर हजारो कोटी रुपये खर्च होऊनही अनेक प्रकल्प बंद पडल्याचा दावा करत, या संपूर्ण प्रकरणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः लक्ष घालून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी सुलभा उबाळे यांनी केली आहे.

Share.
Leave A Reply

Please Join Our WhatsApp Group
Exit mobile version