Spread the love

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – शहरात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे निर्माण झालेल्या आपत्कालीन परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी हे विविध आपत्कालीन स्थळभेटी, परिस्थितीचा आढावा, बचाव व मदतकार्याचे समन्वयन तसेच आषाढी वारी नियोजनासंदर्भातील प्रशासकीय कामकाजामध्ये व्यस्त आहेत. या पार्श्वभूमीवर ते महानगरपालिका मुख्यालयातील कार्यालयात अभ्यागतांच्या भेटीसाठी उपलब्ध राहणार नाहीत.

नागरिकांनी तसेच अभ्यागतांनी याची नोंद घ्यावी व अत्यावश्यक प्रशासकीय कामांसाठी संबंधित विभागप्रमुख किंवा अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा, असे आवाहन पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.

नागरिकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत महानगरपालिका प्रशासन आपत्कालीन परिस्थितीवर नियंत्रण मिळविण्यासाठी सर्व यंत्रणांच्या समन्वयाने युद्धपातळीवर कार्यरत आहे.

Share.
Leave A Reply

Please Join Our WhatsApp Group
Exit mobile version