Spread the love

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पुणे जिल्ह्यात अतिवृष्टीचा इशारा आणि प्रतिकूल हवामानाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी मंगळवार, ७ जुलै २०२६ रोजी जिल्ह्यातील सर्व प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांना सुट्टी जाहीर केली आहे.

भारतीय हवामान विभागाने पुणे जिल्ह्यासाठी अतिवृष्टीचा इशारा दिल्याने विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने हा निर्णय घेण्यात आला आहे. जिल्हा परिषद, नगरपालिका, खासगी, अनुदानित, विनाअनुदानित तसेच इंग्रजी माध्यमाच्या सर्व शाळांना हा आदेश लागू राहणार आहे. मात्र, मुख्याध्यापक, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी आवश्यकतेनुसार शाळेत उपस्थित राहून स्थानिक प्रशासनाच्या सूचनांनुसार आपत्ती व्यवस्थापनाचे कामकाज करावे, असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.

Share.
Leave A Reply

Please Join Our WhatsApp Group
Exit mobile version