Spread the love

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पवना नदीला पूर आल्याने मोरया गोसावी मंदिर पाण्याखाली गेले आहे. फ क्षेत्रीय कार्यालयांतर्गत चिखली डिफेन्स कॉलनी येथील १०० कुटुंबे चिखली गावठाण येथील महापालिका शाळेत, केशवनगर येथील दहा कुटुंब महापालिका शाळेत स्थलांतरित करण्यात आली आहेत. किवळे येथे पूरस्थितीत अडकलेल्या गर्भवती महिलेची अग्निशमन विभागाकडून सुखरूप सुटका करण्यात आली आहे.

पवना, मुळा आणि इंद्रायणी नद्यांच्या पाणीपातळीत झालेली वाढ आणि नदीकाठच्या परिसरातील पूरस्थिती लक्षात घेता संभाव्य धोकादायक भागातील नागरिकांना सुरक्षित स्थळी स्थलांतरित करण्याची कार्यवाही तातडीने हाती घेण्यात आली आहे. आंबेडकर कॉलनी, भाटनागर आणि रिव्हर रोड परिसरातील नागरिकांना साबळे प्राथमिक शाळा तसेच महर्षि वाल्मिकी आश्रम येथे सुरक्षितरित्या स्थलांतरित करण्यात आले आहे. तसेच फुगेवाडी आणि कासारवाडी येथील नदीकाठच्या परिसरातील नागरिकांनाही सुरक्षित स्थळी हलविण्याची कार्यवाही सुरू आहे.

मोरया गोसावी मंदिर तसेच केशवनगर परिसरात स्थलांतरित नागरिकांसाठी निवारा, भोजन आणि इतर मूलभूत सोयी सुविधांची व्यवस्था करण्यात आली आहे. मुळानगर येथे महापालिकेचे विशेष आपत्कालीन पथक तैनात करण्यात आले असून तेथील परिस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवण्यात येत आहे. याशिवाय, पूरबाधित नागरिकांसाठी आवश्यक त्या सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.

Share.
Leave A Reply

Please Join Our WhatsApp Group
Exit mobile version