Spread the love

पिंपरी चिंचवड जैन महासंघाच्या वतीने विद्यार्थी गुणगौरव समारंभ उत्साहात संपन्न

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी चिंचवड जैन महासंघाच्या वतीने दरवर्षी प्रमाणे ह्याही वर्षी इ १० वी /१२ वी मध्ये चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव समारंभ अतिशय दिमाखदार सोहळ्यात संपन्न झाला, कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथी म्हणून जीएसटी कस्टम च्या पुणे विभागाच्या सहाय्यक आयुक्त श्रीमती दामिनी दिवाकर उपस्थित होत्या तर अध्यक्ष स्थानी जैन महासंघाचे अध्यक्ष श्रेयस पगारिया होते, यावेळी मंचावर महासंघाचे संस्थापक अध्यक्ष सीए डॉ अशोककुमार पगारिया, कार्याध्यक्ष विजय भिलवडे, महामंत्री संदीप फुलफगर ,निवर्तमान अध्यक्ष उमेश पाटील, जी एस टी अधीक्षक देवेंद्र बाकलीवाल उपस्थित होते. या समारंभात ९९ % पासून ८०% पर्यंत गुण मिळालेल्या ११० विद्यार्थ्यांचा सन्मान चिन्ह प्रमुख अतिथी आणि महासंघाच्या व जैन श्रावक संघाच्या अध्यक्ष व पदाधिकारींच्या हस्ते देऊन करण्यात आला .

यावेळी बोलताना दामिनी दिवाकर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना विचार मांडले कि, आपण नेहमी उच्च ध्येय मनाशी बाळगून त्या ध्येयपुर्तिसाठी अथक परिश्रम करावे, निश्र्चित पणे तुम्ही यशस्वी व्हाल , अपयशाने खचून न जाता पुन्हा उभारी घेऊन प्रयत्नांची पराकाष्ठा करावी , नक्की च यश मिळेल, कारण कोशिश करने वालोंकी कभी हार नहीं होती!! यावेळी महासंघाचे संस्थापक अध्यक्ष डॉ अशोककुमार पगारिया यांनी ही मार्गदर्शन करताना विचार मांडले कि इरादा पक्का,हौसला बुलंद और मेहनत करने की तैयारी हो , तो कुछ भी असंभव नहीं है !! आपल्या आवडीचे ध्येय निवडा आणि त्या ध्येयाशी एकरुप व्हा आणि यशवंत व्हा. ” या कार्यक्रमासाठी महासंघाचे माजी अध्यक्ष अजित पाटील , नितीन बेदमुथा,प्रा प्रकाश कटारिया आदि पदाधिकारी तसेच श्री संघाचे अध्यक्ष दिलीप भन्साळी, नंदकुमार लुनावत , अशोक बागमार, विजय बलदोटा, सुभाष सुराणा,अनिता नहार ,सौ लता पगारिया, आदि मान्यवर उपस्थित होते. यावेळी यशवंतराव चव्हाण सभागृहाचे अध्यक्ष सुनील जाधव यांचा विशेष सत्कार करण्यात आला, कार्यक्रमाच्या संयोजनासाठी, महासंघाचे पदाधिकारी श्रेणिक मंडलेचा, विरेश छाजेड़, अभिनंदन छाजेड़ ,तुषार मुथा, शुभम कटारिया ,रुपेश बागमार ,हर्षल लुंकड,सचिन कोगनोळे, हितेश सुराणा यांनी परिश्रम घेतले

Share.
Leave A Reply

Please Join Our WhatsApp Group
Exit mobile version