Spread the love

उबाठा गटाला धक्का; काळेवाडीतील हरेश नखाते व सुजाता नखाते यांचा शिवसेनेत प्रवेश

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – उबाठा गटातील चिंचवड विधानसभा मतदारसंघातील हरेश नखाते व सुजाता नखाते यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी एकनाथ शिंदे गटातील शिवसेनेत जाहीर प्रवेश केला.

मुंबई येथे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री तथा शिवसेना मुख्यनेते एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानी झालेल्या कार्यक्रमात खासदार श्रीरंग बारणे,खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, उद्योगमंत्री तथा शिवसेना संपर्कप्रमुख उदय सामंत यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला.

यावेळी चिंचवड विधानसभा प्रमुख हरेश आबा नखाते, विभाग संघटिका सुजाता हरेश नखाते, विभाग प्रमुख गोरख पाटील, विभाग संघटक गणेश वायभट यांच्यासह काळेवाडी-रहाटणी परिसरातील अनेक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला.

या पक्षप्रवेशामुळे चिंचवड विधानसभा मतदारसंघात शिवसेनेच्या संघटनात्मक ताकदीत वाढ झाली असून, पक्षाची तळागाळातील बांधणी अधिक मजबूत होत असल्याचे सांगण्यात आले.

Share.
Leave A Reply

Please Join Our WhatsApp Group
Exit mobile version