नवी सांगवी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक ३१ मधील पिंपरी चिंचवड महापालिकेच्या नवनिर्वाचित विद्यमान नगरसेविका पल्लवी महेशद जगताप यांच्या नूतन सेवा व संवाद कार्यालयाचा उद्घाटन सोहळा रविवारी (दि. २८) सायंकाळी ६ ते ९ या वेळेत अतिशय उत्साहात आणि आनंदमय वातावरणात पार पडला. या सेवा व संवाद कार्यालयामुळे परिसरातील नागरिकांच्या समस्या सोडवणे अधिक सुकर होणार आहे.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला चिंचवड विधानसभेचे लोकप्रिय आमदार शंकरभाऊ जगताप यांच्या हस्ते फीत कापून आणि उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी नुकतीच मराठी पत्रकार संघ पुणे जिल्हा अध्यक्ष पदी नियुक्ती झाल्याने संजय मराठे यांचा तसेच आदी विविध क्षेत्रातील मान्यवरांचा यावेळी यथोचित सन्मान करण्यात आला.
उद्घाटन सोहळ्यानंतर परिसरातील नागरिकांशी आमदार शंकरभाऊ जगताप तसेच पल्लवीताई महेशदादा जगताप यांनी संवाद साधला. यावेळी उपस्थित मान्यवरांनी नूतन सेवा व संवाद कार्यालयाच्या माध्यमातून जनसेवा आणि विकासाची कामे अधिक वेगाने होतील, असा विश्वास याप्रसंगी व्यक्त केला.
लोकाभिमुख उपक्रम हे कार्यालय नागरिकांना आपल्या समस्या मांडण्यासाठी आणि स्थानिक प्रशासनाशी संपर्क साधण्यासाठी एक महत्त्वाचे व्यासपीठ ठरणार आहे.
या सोहळ्याला परिसरातील अनेक प्रतिष्ठित नागरिक, राजकीय पदाधिकारी, आणि मोठ्या संख्येने स्थानिक कार्यकर्ते उपस्थित होते.
आपल्या हक्काच्या नगरसेविकेचे सेवा व संवाद कार्यालय सुरू झाल्यामुळे परिसरातील रहिवाशांमध्ये आनंदाचे वातावरण होते. या नव्या सेवा व संवाद कार्यालयाच्या माध्यमातून जनसेवेचा हा संकल्प असाच अविरत सुरू राहील आणि विकासकामांना गती मिळेल, अशी ग्वाही यावेळी नगरसेविका पल्लवीताई महेशदादा जगताप यांनी दिली.
