Spread the love

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – राष्ट्रीय सफाई कर्मचारी आयोगाने पिंपरी-चिंचवड महापालिकेतील सफाई कर्मचाऱ्यांना असुरक्षित परिस्थितीत काम करावे लागत असल्याच्या तक्रारींची गंभीर दखल घेतली आहे. गटार, नाले, सेप्टिक टँक व सांडपाणी वाहिन्यांच्या स्वच्छता कामांमध्ये सुरक्षा नियमांचे पालन होत आहे का, याची चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

महापालिकेला १५ दिवसांत अॅक्शन टेकन रिपोर्ट सादर करण्याचे निर्देश देण्यात आले असून, कर्मचाऱ्यांची सुरक्षा साधने, वैद्यकीय सुविधा, अपघातांची माहिती आणि कंत्राटदारांची जबाबदारी यांचा अहवालात समावेश करावा असे सांगण्यात आले आहे. नियमभंग आढळल्यास संबंधितांवर कायदेशीर व प्रशासकीय कारवाई करण्याचेही आयोगाने स्पष्ट केले आहे.

Share.
Leave A Reply

Please Join Our WhatsApp Group
Exit mobile version