Spread the love

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी-चिंचवड शहरात महिला मोर्चातर्फे आंतरराष्ट्रीय योग दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. हा उपक्रम शहराध्यक्ष शत्रुघ्न ऊर्फ बापू काटे, आमदार महेश लांडगे, आमदार शंकर जगताप, आमदार उमाताई खापरे, आमदार अमित गोरखे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि महिला मोर्चाच्या अध्यक्षा सुजाता पलांडे यांच्या नेतृत्वाखाली यशस्वीरीत्या पार पडला.

यावेळी योगाचे महत्त्व पटवून देताना महिलांच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी योगाभ्यास कसा फायदेशीर ठरतो, यावर मार्गदर्शन करण्यात आले. या कार्यक्रमाचे नियोजन अत्यंत नेटके करण्यात आले होते. या नियोजनामध्ये प्रामुख्याने सरचिटणीस मधुकर बच्चे, संयोजक विकास डोळस यांच्यासह महिला मोर्चाच्या सरचिटणीस अनघा रुद्र, उपाध्यक्ष ऐश्वर्या बाबर, चिटणीस स्वाती देशमुख, उपाध्यक्ष संजना मराठे आणि जयश्री मकवाना यांचा मोलाचा सहभाग होता.
कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी शहरातील विविध मंडळांच्या अध्यक्षांचे विशेष योगदान लाभले. यामध्ये रावेत-वालहेकर वाडी, चिंचवड-काळेवाडी, थेरगाव-वाकड (ज्योत्स्ना कलाटे ), रहाटणी-पिंपळे सौदागर (रेणुका विजय हेगडे), सांगवी-पिंपळे गुरव (स्वाती जाधव), प्राधिकरण-चिंचवड (नीता कुशारे), आकुर्डी गाव-शाहू नगर (मोनिका संतोष वाघमारे), सं.तु.नगर- खराळवाडी-कासाzरवाडी (रंजनाताई अर्जुन जगताप), फुगेवाडी- दापोडी-बोपखेल (सविता किसन सूर्यवंशी), चिखली-कृष्णानगर, तळवडे-यमुनानगर (किरण पाचपांडे), मोशी-चन्होली (चित्रा संतोष अभंग), दिघी-गवळीनगर-गव्हाणे वस्ती (सुवर्णा गावडे) आणि धावडे वस्ती-इंद्रायणीनगर-नेहरूनगर (सुरेखा पांचाळ) या सर्व मंडलांच्या अध्यक्षांनी तसेच जोशना कलाटे, मनीषा कुलकर्णी, मीनाक्षी गायकवाड, वसुधा देशपांडे, सुप्रिया वझे, स्वाती पवार आणि नीता भालेराव यांनी घेतलेली मेहनत कौतुकास्पद ठरली.

महिलांमधील आरोग्याविषयीची जागरूकता वाढवण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.

Share.
Leave A Reply

Please Join Our WhatsApp Group
Exit mobile version