Spread the love

पिंपळे गुरव, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – योगवेद क्लासतर्फे आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात मोठ्या संख्येने विद्यार्थी व योगप्रेमींनी उत्स्फूर्त सहभाग घेतला.

कार्यक्रमाची सुरुवात प्रार्थना व ओंकार उच्चाराने करण्यात आली. त्यानंतर विविध योगासनांचे प्रात्यक्षिक सादर करण्यात आले.सहभागी विद्यार्थ्यांनी प्राणायाम व ध्यानाचा सराव करून योगाचे महत्त्व अनुभवले.

या प्रसंगी योग प्रशिक्षक अस्मिता मॅम अस्मिता आकडकर यांनी योगाचे आरोग्यावर होणारे फायदे समजावून सांगत नियमित योग करण्याचे आवाहन केले.या कार्यक्रमामुळे सहभागींच्या मनात आरोग्याबाबत जागरूकता निर्माण झाली.

योग दिनाचे औचित्य साधून मराठी पत्रकार संघ,पुणे जिल्हाच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल संजय मराठे यांचा विशेष सत्कार करण्यात आला.

या कार्यक्रमासाठी मान्यवर म्हणून डॉ. दत्तात्रय कोकाटे (ज्येष्ठ वैद्यकीय अधिकारी), शामभाऊ जगताप (नगरसेवक), सागर आंघोळकर (माजी नगरसेवक),माने शांताराम (सहाय्यक आरोग्य अधिकारी),उमेश बोरसे,संतोष महामुनी, संगीता मॅडम (पत्रकार), नगराळे (पत्रकार),दत्तात्रय पी. आय.सुभाष जाधव,विशाल जाधव,नितीन कदम,लोणकर साहेब (आयटी) आदी उपस्थित होते.

कार्यक्रम यशस्वी पार पाडण्यासाठी देवांना गट्टूवार साहेब,अशोक सुमरे,सचिन घनवट,अशोक भोसले,बदाम कांबळे,सुधाकर मोहिते यांनी विशेष परिश्रम घेतले.

कार्यक्रमाच्या शेवटी पुनीत सिंग यांनी उपस्थित पाहुण्यांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता केली.

Share.
Leave A Reply

Please Join Our WhatsApp Group
Exit mobile version