Spread the love

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी-चिंचवड शहरामध्ये अतिशय जुने नावाजलेले आणि लोकप्रिय असलेले संघवी केसरी महाविद्यालयाची प्रवेश प्रक्रिया अद्याप सुरू करण्यात आलेली नाही, बारावीच्या निकालानंतर अपेक्षित वेळेत ही प्रक्रिया सुरू न केल्याने विद्यार्थी वर्गात पालक वर्गात चिंतेचे वातावरण आहे.

याबाबत आज काँग्रेसच्या एका शिष्टमंडळाने पुणे विद्यापीठातील प्रशासन विभागात, प्रभारी कुलगुरू डॉ. पराग काळकर यांची भेट घेत संगवी केसरी महाविद्यालयाची प्रवेश प्रक्रिया तात्काळ सुरू करण्यात यावी अशी मागणी करत याबाबतचे निवेदन दिले.

याबाबत माहिती देताना डॉ काळकर म्हणाले, याबाबत विविध जणांकडून मागणी होत आहे, महाविद्यालयाला कारणे दाखवा नोटीस बजावली आहे, लवकरच प्रवेश प्रक्रिया पूर्वरत होईल.

याबाबत माहिती देताना काँग्रेसच्या शहराध्यक्ष नरेंद्र बनसोडे यांनी सांगितले, “मोहन नगर चिंचवड दत्तनगर त्याचप्रमाणे विद्यानगर परिसरातील गरीब विद्यार्थी, होतकरू विद्यार्थी, झोपडपट्टी मध्ये राहणारे विद्यार्थी या सर्वांना महाविद्यालयीन शिक्षणासाठी उपयुक्त असलेले संगवी केसरी महाविद्यालय हे गरीब, गरजू, मध्यमवर्गीय विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे, काँग्रेसच्या शिष्टमंडळाने कुलगुरूंना भेटण्याचा प्रयत्न केला मात्र ते सोमवार पर्यंत उपलब्ध नसल्याने प्रभारी कुलगुरूंची भेट घेतली. सोमवारी पुन्हा सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू श्री.सुरेश गोसावी यांची याबाबत भेट घेऊन या घटनेचा पाठपुरावा करून हे महाविद्यालय पुन्हा सुरू करण्याबाबत पाठपुरावा करणार आहोत” असे काँग्रेसचे शहराध्यक्ष नरेंद्र बनसोडे यांनी सांगितले.

काँग्रेसच्या शिष्टमंडळामध्ये नरेंद्र बनसोडे, विल्यम साळवी, जितेंद्र छाबडा, हरीश डोळस आदी पदाधिकारी उपस्थित होते.

Share.
Leave A Reply

Please Join Our WhatsApp Group
Exit mobile version