पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यपूर्तीनिमित्त देशभरात आयोजित करण्यात येत असलेल्या ‘प्रगती पथ यात्रा’ अभियानांतर्गत चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे आमदार शंकर जगताप यांनी केशवनगर माध्यमिक शाळेच्या नूतनीकरण कामाची पाहणी केली.
या भेटीदरम्यान आमदार शंकर जगताप यांनी शाळेच्या सुरू असलेल्या कामाची प्रत्यक्ष पाहणी करून कामाचा दर्जा, प्रगती आणि वेळेचे नियोजन याबाबत माहिती घेतली. विद्यार्थ्यांना आधुनिक व दर्जेदार सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी काम लवकरात लवकर पूर्ण करण्याच्या सूचना त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.
‘प्रगती पथ यात्रा’च्या माध्यमातून केंद्र सरकारच्या विविध विकासकामांची माहिती जनतेपर्यंत पोहोचवणे तसेच स्थानिक पातळीवरील लोकउपयोगी प्रकल्पांचा आढावा घेणे हा उद्देश असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
याप्रसंगी चिंचवड-काळेवाडी मंडल अध्यक्ष ॲड. हर्षद नढे, नगरसेवक सुरेश शिवाजी भोईर, मनीषा योगेश चिंचवडे, अपर्णा डोके, कोमल काळे, विनोद नढे, भाजपा सरचिटणीस मोरेश्वर शेडगे, मधुकर बच्चे, युवा मोर्चा प्रदेश सदस्य अजित कुलथे, भाजप उपाध्यक्ष रवींद्र देशपांडे, काळूराम बारणे, संतोष कलाटे, सोना गडदे, दिपाली कलापुरे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे उपअभियंता अंदुरे साहेब व कनिष्ठ अभियंता देवकर साहेब यांनी शाळेच्या नूतनीकरण कामाची सविस्तर माहिती उपस्थितांना दिली.
विद्यार्थ्यांना चांगल्या शैक्षणिक सुविधा मिळाव्यात यासाठी शाळेच्या विकासकामांना प्राधान्य दिले जात असल्याचे आमदार शंकर जगताप यांनी यावेळी स्पष्ट केले.
