Spread the love

२ हजार कष्टकरी कामगारांना कौशल्य विकास प्रशिक्षण व प्रमाणपत्र वाटप

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – महाराष्ट्र राज्यातील विकासामध्ये कामगारांचा मोलाचा वाटा असून पारंपारिक काम करणारे विविध कामगार आहेत या कामगारांना कौशल्य विकासाची जोड मिळाल्यास त्यांच्यातून त्यांची वैयक्तिक प्रगती सह राज्याची सुद्धा प्रगती होणार म्हणून कौशल्य अभियान आयोजित करणे आणि त्यात कामगारांचा सहभाग वाढवून कामगारांनी अधिकाधिक लाभ घ्यावा असे प्रतिपादन महाराष्ट्र विधानसभेचे उपाध्यक्ष आण्णा बनसोडे यांनी केले.

कष्टकरी संघर्ष महासंघ महाराष्ट्र राज्य आयोजित कामगार कौशल्य विकास अभियानाला आकुर्डी येथे उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला
अभियान अंतर्गत लाभार्थींना विविध कौशल्य प्रशिक्षण, महाराष्ट्र शासनाचे प्रमाणपत्र तसेच लाभार्थीना अर्थसहाय्य योजना धनादेश, विविध शासकीय योजनांचा लाभ प्रदान करण्यात आला.

या अभियानाचे उद्घाटन मा. अण्णा बनसोडे (उपाध्यक्ष, महाराष्ट्र विधानसभा तथा आमदार, पिंपरी विधानसभा) यांच्या हस्ते झाले. महासंघाचे अध्यक्ष तथा कामगार नेते काशिनाथ नखाते, मा. ज्ञानेश्वर कांबळे माजी अध्यक्ष लीडकॉम, महानगरपालिका पथ विक्रेता समितीसदस्य राजू बिराजदार,किरण साडेकर,सलीम डांगे, प्रदेश उपाध्यक्ष राजेश माने, माधुरी जलमूलवार, लाला राठोड, सुनील भोसले, संभाजी वाघमारे, राजू पठाण,अर्चना कांबळे, वहिदा शेख, सुरेश देडे यांचेसह कष्टकरी, कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बनसोडे पुढे म्हणाले की कष्टकरी संघर्ष महासंघ महाराष्ट्र राज्यामध्ये विविध जिल्ह्यांमध्ये कामगारांना न्याय देण्याचा प्रयत्न करत आहे. कामगारांच्या विविध अडचणी सोडवण्यासाठी म्हणून आम्ही महाराष्ट्र शासनाकडून आवश्यक ते सहकार्य आम्ही देण्याचा प्रयत्न करू यात नगर विकास विभाग असेल, कामगार विभाग आणि कौशल्य विकास अशा सर्व खात्यांचे सहकार्य आम्ही आपणाला नक्कीच देऊ.

नखाते यांनी कामगारांना कौशल्यवृद्धी, स्वावलंबन आणि संघटित लढ्याचे महत्त्व अधोरेखित करत प्रेरणादायी मार्गदर्शन केले. कामगारांचे कौशल्य विकसित होऊन त्यांच्या रोजगाराच्या संधी वाढाव्यात, त्यांच्या कामाच्या गुणवत्तेत सुधारणा व्हावी आणि त्यांना अधिक चांगले वेतन मिळावे, या उद्देशाने विविध प्रकारची प्रशिक्षणे यातून कामगारांचा सर्वांगीण विकासासाठी ठाम आहोत यात सर्व असंघटित कामगारांचा सहभाग वाढवण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत.

कांबळे म्हणाले कष्टकऱ्यांना सामाजिक न्याय आणि श्रमाचा सन्मान यासाठी कौशल्य विकास हा प्रभावी मार्ग असून, प्रत्येक कष्टकरी कामगाराला सन्मानाने जगण्याचा आणि प्रगतीची समान संधी मिळण्याचा हक्क आहे महासंघाचे कार्य कौतुसकास्पद आहे.

या प्रशिक्षणांत २ हजार सहभागी झाले यातील प्रातिनिधिक कामगारांना कौशल्य विकास योजनेअंतर्गत महाराष्ट्र शासनाचे प्रमाणपत्र देण्यात आले. तसेच पात्र लाभार्थींना अर्थसाहाय्याचे वितरण करण्यात आले. कामगारांच्या सुरक्षिततेलाही प्राधान्य देत त्यांच्या कामासाठी आवश्यक असलेल्या सुरक्षा साहित्याचे वाटप करण्यात आले.
दीप प्रज्वलन करून अभियानाची सुरुवात करण्यात आली. सूत्रसंचालन सोमराज नाडे यांनी तर आभार राजू बिराजदार यांनी मानले.

Share.
Leave A Reply

Please Join Our WhatsApp Group
Exit mobile version