Spread the love

लिनिअर गार्डन, पिंपळे सौदागर येथे जागतिक पर्यावरण दिन उत्साहात साजरा

चॅलेंजर पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांनी घेतली पर्यावरण संवर्धनाची शपथ

पिंपळे सौदागर (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – जागतिक पर्यावरण दिनानिमित्त पिंपळे सौदागर येथील लिनिअर गार्डनमध्ये वृक्षारोपण व पर्यावरण जनजागृती कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणाऱ्या या उपक्रमाला नागरिक, विद्यार्थी आणि शिक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

या कार्यक्रमाचे आयोजन भाजपा नगरसेवक शत्रुघ्न काटे, नगरसेविका अनिता काटे तसेच भाजपचे पदाधिकारी राजाभाऊ मसुळकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. यावेळी चॅलेंजर पब्लिक स्कूलने विशेष सहभाग नोंदविला.

कार्यक्रमाला शाळेचे अध्यक्ष संदीप काटे, संचालक निलेश काटे आणि प्राचार्या ज्योतिका मलकानी यांची प्रमुख उपस्थिती होती. मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करून पर्यावरण संरक्षणाचा संदेश देण्यात आला.

नगरसेवक शत्रुघ्न काटे यांनी वाढते प्रदूषण, हवामान बदल आणि जागतिक तापमानवाढ यांसारख्या गंभीर समस्यांवर मात करण्यासाठी प्रत्येकाने किमान एक झाड लावून त्याचे संगोपन करण्याची गरज असल्याचे सांगितले.

नगरसेविका अनिता काटे म्हणाल्या, पर्यावरणाचे रक्षण ही प्रत्येकाची सामूहिक जबाबदारी असून स्वच्छ, हिरवेगार आणि प्रदूषणमुक्त शहर निर्माण करण्यासाठी नागरिकांनी पर्यावरणपूरक जीवनशैलीचा अवलंब करत हरित आणि शाश्वत भविष्यासाठी कटिबद्ध राहण्याचा संकल्प करावा.

यावेळी विद्यार्थ्यांनी आणि नागरिकांनी पर्यावरण संवर्धनाची शपथ घेतली.

Share.
Leave A Reply

Please Join Our WhatsApp Group
Exit mobile version