Spread the love

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपळे गुरव परिसरातील पावसाळी वाहिन्या, ड्रेनेज लाईन आणि चेंबरची दुरावस्था लक्षात घेता पावसाळा सुरू होण्यापूर्वी आवश्यक सफाई आणि दुरुस्तीची कामे तातडीने पूर्ण करावीत, अशी मागणी नगरसेवक श्याम जगताप यांनी जलनि:स्सारण विभागाचे सहशहर अभियंता विनय ओहोळ आणि स्थापत्य विभागाचे सहशहर अभियंता अजय सूर्यवंशी यांच्याकडे केली आहे.

पावसाळ्यापूर्वी सुरू असलेल्या कामांची पाहणी केल्यानंतर त्यांनी जलनि:स्सारण विभागाचे सहशहर अभियंता विनय ओहोळ आणि स्थापत्य विभागाचे सहशहर अभियंता अजय सूर्यवंशी यांना निवेदन सादर केले. यामध्ये पावसाळी वाहिन्या, नाले आणि ड्रेनेज यंत्रणेची तातडीने सफाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.

दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, पिंपळे गुरवमधील अनेक ठिकाणी पावसाळी चेंबर आणि ड्रेनेज लाईनमध्ये मोठ्या प्रमाणावर गाळ, कचरा आणि साचलेले पाणी जमा झाले आहे. यामुळे परिसरात दुर्गंधी पसरत असून नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण होण्याची शक्यता आहे.

तसेच पावसाळ्यात पाणी तुंबून नागरिकांना मोठ्या गैरसोयींचा सामना करावा लागू शकतो. पावसाळ्यात संभाव्य पूरस्थिती व आरोग्यविषयक समस्या टाळण्यासाठी संबंधित विभागाने तात्काळ कारवाई करून चेंबरमधील गाळ आणि कचरा काढावा तसेच संपूर्ण जलनि:स्सारण व्यवस्था सुरळीत करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.

Share.
Leave A Reply

Please Join Our WhatsApp Group
Exit mobile version