चिंचवड (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – चिंचवड येथील कमला एज्युकेशन सोसायटी संचलित प्रतिभा इंटरनॅशनल स्कूल ने यंदा इयत्ता १२वी ( सीबीएसई ) चा बोर्ड परीक्षेत उत्कृष्ट निकालाची परंपरा यंदाही कायम ठेवली.
गायत्री कुंभार हिने ९६.२० टक्के गुण मिळवत शाळेत प्रथम क्रमांक पटकावला. विशेष म्हणजे तिने भौतिकशास्त्र, जीवशास्त्र आणि योगा या विषयांत ९९ गुण मिळवले.
ओंकार गायकवाड याने ९४.८० टक्के गुणांसह द्वितीय क्रमांक मिळवला. आयटी विषयात त्याने १०० पैकी ९९ गुण मिळवले.
• अनशूल पनवेलकर याने ९१.६० टक्के गुण मिळवत तृतीय क्रमांक पटकावला.
पहिल्या सात विद्यार्थ्यांमध्ये वेदांत पाटील, क्रितीग्या सिंग, अक्षय उलियाथ आणि आदित्य यांनीही ९० टक्केपेक्षा जास्त गुण मिळवून उल्लेखनीय यश संपादन केले.
या उत्कृष्ट कामगिरीबद्दल संस्थेचे संस्थापक सचिव डॉ. दिपक शहा, खजिनदार डॉ. भूपाली शहा, संचालिका डॉ. तेजल शहा यांनी शाळेच्या प्राचार्या डॉ. वृंदा मुलतानी जोशी, उपप्राचार्या लिझा सोजू, समन्वयिका गुलनाज खान तसेच शिक्षक, पालक व विद्यार्थी यांचे कौतुक के करून भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या .
