Spread the love

फुले, गांधी, नेहरू विचारमंच आयोजित “महात्मा गांधी आणि राष्ट्रवाद” व्याख्यानाचे प्रथम पुष्प

पिंपरी,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – सर्वधर्मसमभाव हीच भारताची ओळख आणि हाच खरा राष्ट्रवाद आहे. १८८५ मध्ये जात, धर्म, भाषा, वर्ण, रंग, वंश हे सर्व सोडून हिंदू, पारशी, ख्रिश्चन, मुसलमान, शीख समाजातील नागरिक एकत्र येऊन त्यांनी काँग्रेसची स्थापना केली. हीच भारत राष्ट्र उभारणीची सुरुवात होय. भारतात एकत्वाची भावना निर्माण करून त्याचे नेतृत्व करण्याचे काम महात्मा गांधीजींनी केले. दलित समाजाला आत्मसन्मान मिळवून देण्याचे काम डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी केले. गांधी आणि आंबेडकरांमध्ये मतभेद होते, परंतु देशासाठी ते एकत्र होते. त्याचे फलित म्हणजे भारतीय राज्यघटना आहे असे मत ज्येष्ठ गांधीवादी विचारवंत विजय तांबे यांनी व्यक्त केले.

रविवारी (दि. २४ मे) पिंपरी येथे फुले, गांधी, नेहरू विचारमंच च्या वतीने आयोजित केलेल्या “महात्मा गांधी आणि राष्ट्रवाद” या विषयावर आयोजित केलेल्या व्याख्यानात विजय तांबे बोलत होते. यावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, आयोजक दाहर मुजावर, अक्षय शहरकर, केनिथ रेमी तसेच विष्णू नेवाळे, अशोक मोरे, अमरसिंह नाणेकर, मिलिंद फडतरे, किरण खाजेकर, मयूर जैस्वाल, गौरव चौधरी, अनिरुद्ध कांबळे, नरेंद्र बनसोडे, हभप सांगोळे, चैतन्य रणदिवे, महेश पाटील, बाबासाहेब पाटील, गिरिजा कुदळे, सायली नढे, जीविका उठाडा, संदेश भंडारी, महालिंग स्वामी, यशराज पारखी, मॅन्युअल डिसोझा, निक्सन ऑगस्टीन, इरफान शेख, बसवराज कंजे, जिंदा सांडभोर, सूरज कुलकर्णी, सचिन दुरगुडे, वैजनाथ शिरसाठ, अनिल कदम, मनोज ढकोलिया, मंगेश मोरे, राजू शेख, अल्ताफ शेख, सुर्यकांत जाधव, किरण नढे आदी उपस्थित होते.
विजय तांबे यांनी सांगितले की, भारतीय स्वातंत्र्यलढ्याचा पाया १९२८ मध्ये झालेल्या मिठाच्या सत्याग्रहात रचला गेला. हा सत्याग्रह अस्मितेच्या मुद्द्यावर लढला गेला. यामध्ये सर्व समाज घटकांनी सहभाग घेतला होता. १९४२ मध्ये सेवाग्राम मध्ये झालेल्या बैठकीत निशस्त्र प्रतिकाराचा निर्णय झाला. १९४७ ला स्वातंत्र्यप्राप्ती वेळी विस्टन चर्चिल याने भाकीत केले की हा देश खूप काळ एकत्र राहू शकणार नाही. या देशात अनेक धर्म, जाती, वंश आहे. परंतु त्याचे भाकीत भारतीय लोकशाहीचा राज्यघटनेमुळे खरे ठरणार नाही. देशात एकत्वाची भावना निर्माण करून त्याचे नेतृत्व महात्मा गांधी यांनी केले. भारतातील दलित समाजाला आत्मसन्मान मिळवून देण्याचे काम डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केले. पुण्यामध्ये महात्मा फुले वाड्यावर गेल्यावर महात्मा गांधी म्हणाले होते की देश घडविणारे खरे महात्मा हे जोतीराव फुले आहेत. फुले, गांधी, नेहरू या महान व्यक्तींमुळे भारतीय राष्ट्रवाद सर्व समावेशक आहे. घटना समितीच्या शेवटच्या भाषणात डॉ. आंबेडकर म्हणाले आहेत की घटना चांगली दिली आहे, परंतु ती चालवणारे देखील चांगले पाहिजेत. अशी १८८५ ते भारतीय राज्यघटना या काळातील विस्तृत माहिती विजय तांबे यांनी दिली.
अक्षय शहरकर, केनिथ रेमी यांनी स्वागत केले आणि दाहर मुजावर यांनी सूत्र संचालन केले.

Share.
Leave A Reply

Please Join Our WhatsApp Group
Exit mobile version