पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – ज्येष्ठ गायिका स्व. आशा भोसले यांना पिंपरी चिंचवड मधील नामांकित विविध भारती म्युझिकल इव्हेंट या संस्थेच्या वतीने श्रद्धांजली वाहण्यात आली.
निगडी येथील ग. दि. माडगूळकर नाट्यगृह येथे नंदकुमार कांबळे यांनी “पिया तू अब तो आजा” हा आशा भोसले यांनी गायलेल्या हिंदी, मराठी गीतांच्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यातील सुमधुर बहारदार गीतांना रसिक श्रोत्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. या कार्यक्रमाचे आयोजन विनामूल्य केले होते.
यावेळी प्रसन्ना आणि प्रीतम वंजारी, मंगेश सोनवणे, विलास गाधडे, मोहन भस्मे, मोहिनी जाधव, विकास जगताप, मल्लिकार्जुन इंगळे, ऋचा गांगल, निळकंठ निमगावकर, राजेंद्र शिंदे, परमेश्वर घाडगे, मुकेश चौधरी, नेहा चौधरी, फ्रेंड्स ट्रेकिंग क्लब अध्यक्ष वसंत ठोंबरे, रंजना ठोंबरे, जयसिंग कांबळे, विश्वास सोहनी, वंदना सोहनी, पोलिस उपनिरीक्षक संतोष माळी, गणेश लोढ, प्रकाश पवार आणि प्रकाश येवला आदी उपस्थित होते.
नंदकुमार कांबळे, विनायक कदम, राजेंद्र पगारे, चंद्रकांत हिवरकर, शैलेंद्र पाटील, उत्तम जाधव, शुभांगी पवार, नेहा दंडवते, डॉ. आरोही पाटे, डॉ. संदीप गायकवाड, स्वाती पाटील, अनिल जंगम, पंकज कथलकर आणि डॉ. कविता बोंडे या गायक कलाकारांनी आपल्या सुमधुर आवाजात हिंदी व मराठी गीते सादर केली. यातील अनेक गीतांना वन्स मोअर ची मागणी केली.
‘चांदणे शिंपीत जा’, ‘धुंदीत गाऊ’, ‘फिटे अंधाराचे जाळे’ या मराठी गीतांसह ‘पिया तू अब तो आजा’, ‘रेशमाच्या रेघांनी’, ‘जीना क्या अजी प्यार बिना’ गीतांना रसिकांनी विशेष दाद दिली.
आशा भोसले यांनी गायलेले ‘ये मेरा दिल प्यार का दिवाना’ हे गीत अनिल जंगम यांनी महिलेच्या आवाजात सादर केले ते विशेष आकर्षण ठरले. सौमिल आणि शैलेश घावटे, विक्रम अंबिके तांत्रिक सहाय्य केले. सूत्रसंचालन नेहा दंडवते आणि अरुण सरमाने आणि आभार सचिन शेटे यांनी मानले.
