Spread the love

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – आरसीसी (RCC) क्लासेसचा संचालक शिवराज मोटेगावकर याला NEET पेपरफुटी प्रकरणात CBI कडून अटक करण्यात आली आहे. या क्लासच्या पिंपरी शाखेतील कर्मचारी, प्राध्यापकाचाही या घोटाळ्यात सहभाग असून त्यांच्यावरती गुन्हे दाखल करावे अशी मागणी कामगार नेते काशिनाथ नखाते यांनी केली आहे.

नीट घोटाळ्यात सहभागाची व या प्रकरणाची सखोल आणि निष्पक्ष चौकशी होणे अत्यंत आवश्यक असून पिंपरी येथील RCC कार्यालयातील शिक्षक, कर्मचारी यांचीही घोटाळ्यात सहभाग असण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यांनीही अनेक विद्यार्थ्यांचे पैसे लुटलेले आहेत का ? याची चौकशी करून गुन्हे दाखल करण्याची मागणी आज पिंपरीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुहास आव्हाड यांना भेटून निवेदनाद्वारे करण्यात आली.

शिक्षण हे समाज परिवर्तनाचे प्रभावी माध्यम आहे, त्यामुळे शिक्षण क्षेत्रात भ्रष्टाचार, फसवणूक किंवा पेपरफुटीसारख्या गंभीर प्रकारांना कोणतीही माफी मिळता कामा नये. विद्यार्थ्यांच्या मेहनतीवर, पालकांच्या कष्टाच्या पैशांवर आणि विश्वासावर कुणीही घाला घालत असेल, तर त्यांच्यावर कठोर कारवाई झालीच पाहिजे. एका महिन्याच्या आत पिंपरी येथील कार्यालय कायमस्वरूपी बंद करण्यात यावे. अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला.

Share.
Leave A Reply

Please Join Our WhatsApp Group
Exit mobile version