Spread the love

चिंचवडमध्ये भव्य कामगार मेळावा उत्साहात संपन्न ; श्रम प्रतिष्ठा गौरव पुरस्कार, सुरक्षा साधने व शिष्यवृत्ती लाभांचे वाटप

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी चिंचवड कामगार नगरी, औद्योगिक नगरी आहे आणि यामुळे कामगारांचे प्रश्न विविध आहेत हे प्रश्न सोडवण्यासाठी आणि तमाम महाराष्ट्रातील संघटित व असंघटित कामगारांना न्याय व योजनाचा लाभ देण्यासाठी कामगारांचे प्रश्न घेऊन विधानसभेमध्ये नक्की मांडणार असे आश्वासन आमदार महेश लांडगे यांनी दिले.

कष्टकरी संघर्ष महासंघ महाराष्ट्र राज्य आणि क्रांती कष्टकरी असंघटित कामगार संघ यांच्या वतीने कामगार दिन व महाराष्ट्र दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेला भव्य कामगार मेळावा चिंचवड येथील संभाजीनगर येथे थरमॅक्स चौकात उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.

या मेळाव्याची सुरुवात ‘आता उठवू सारे रान’ या गीताने केली.

कामगार साहित्य परिषदेचे अध्यक्ष पुरुषोत्तम सदाफुले, क्रीडा समिती सभापती कैलास कुटे, नगरसेवक तुषार हिंगे, नगरसेवक निलेश नेवाळे, नगरसेविका योगिता नागरगोजे, बहुजन सम्राट सेनेचे संतोष निसर्गंध, जालना जिल्हाध्यक्ष भगवान काळे, हिंदुराव पाटील, गोरख पाटील, किरण साडेकर, राजू बिराजदार, सचिन नागणे, जनाबाई वाघमारे यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते.
लांडगे पुढे म्हणाले की कामगारांच्या वेगवेगळे प्रश्न असतात त्यांच्याशी माझाही संवाद असतो संघटना काम करते म्हणून विविध घटकांना न्याय मिळत असतात अशा संघटनेच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहणे आपले कर्तव्य आहे. बदलत्या परिस्थितीनुसार त्यांना न्याय देण्याची भूमिका आपण घेतली पाहिजे
नखाते यांनी “समाजाच्या प्रगतीचा पाया हा श्रमिकांच्या कष्टांवर उभा असतो. कामगार, रिक्षा चालक, फेरीवाले, बांधकाम कामगार आणि असंघटित क्षेत्रातील कामगारांच्या विविध समस्या मांडल्या.

यावेळी सामाजिक प्रतिष्ठेला बळ देण्यासाठी “श्रम प्रतिष्ठा गौरव पुरस्कार वितरण सोहळा” पार पडला. श्रम प्रतिष्ठा गौरव हा पुरस्कार घरेलू कामगार पायल चव्हाण, हातगाडी चालक रामभाऊ हाके, रिक्षा चालक महादेव सोनवणे, बांधकाम कामगार बबन बहिरवाल, सुरक्षा रक्षक शंकर बुरख, स्वच्छता कामगार अनुरथ साबळे, शव वाहिका वाहन चालक काकासाहेब भोईटे यांना देण्यात आला, तसेच उत्कृष्ट महिला बचत गटांचा सन्मान करण्यात आला. यासोबतच विविध क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या कामगारांचा सन्मान करण्यात आला. तसेच कामगारांना विविध शासकीय योजनांच्या लाभांचे वाटप करण्यात आले. याशिवाय, कामगारांच्या पाल्यांनी शैक्षणिक क्षेत्रात मिळवलेले विशेष प्राविण्य याबाबत त्यांचे कौतुक करण्यात आले. तसेच कामगारांच्या पाल्यांना विविध शिष्यवृत्ती योजनांचे धनादेश (चेक) प्रदान करण्यात आले.

हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी युवराज निलवर्ण, राजेश माने, सुरज देशमाने, बालाजी लोखंडे, नाना कसबे, तुषार घाटुळे, वृषाली पाटणे, माधुरी जलमूलवार, अर्चना कांबळे, लक्ष्मी गायकवाड, सुनिता पोतदार यांनी मेहनत घेतली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सोमनाथ नाडे तर आभार सुनील भोसले यांनी मानले.

कष्टकरी, कामगार, फेरीवाले, रिक्षा चालक, बांधकाम कामगार तसेच असंघटित क्षेत्रातील हजारो कामगार बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कामगार एकजुटीचे भव्य शक्तीप्रदर्शन घडवून आणले.

Share.
Leave A Reply

Please Join Our WhatsApp Group
Exit mobile version