Spread the love

पिंपरी,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी चिंचवड शहराच्या नावलौकिकात आपल्या कार्यकर्तृत्वाने मोलाची भर घालणाऱ्या तसेच कला, क्रीडा, सांस्कृतिक आणि साहित्य क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तिमत्त्वांचा महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत सन्मान करण्याचे धोरण निश्चित करण्यात आले आहे. त्या धोरणानुसार पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने आज पार पडलेल्या सर्वसाधारण सभेत ज्येष्ठ तबलावादक धोंडीराम सायकर यांचा महापौर रवि लांडगे यांच्या हस्ते मानपत्र देऊन सन्मान करण्यात आला.

यावेळी उपमहापौर शर्मिला बाबर, स्थायी समिती सभापती अभिषेक बारणे, सत्तारूढ पक्षनेते प्रशांत शितोळे, विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर, आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी, क्रीडा, कला, साहित्य व सांस्कृतिक समिती सभापती कैलास कुटे, शिवसेना गटनेते विश्वजीत बारणे, माजी महापौर तथा नगरसदस्या अपर्णा डोके, नगरसदस्या मनिषा चिंचवडे, नगरसदस्य अनंत कोऱ्हाळे, सुरेश भोईर तसेच उपआयुक्त अण्णा बोदडे, विशेष अधिकारी किरण गायकवाड, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक यांच्यासह ज्येष्ठ तबलावादक धोंडीराम सायकर यांची मुले नरेंद्र सायकर, निलेश सायकर व नातू साहिल सायकर हे देखील उपस्थित होते. यावेळी मानपत्राचे वाचन जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक यांनी केले.

ज्येष्ठ तबलावादक धोंडीराम सायकर यांनी तबल्याच्या तालातून शहराच्या सांस्कृतिक परंपरेला दिले समृद्ध अधिष्ठान

पिंपरी चिंचवड शहराच्या सांस्कृतिक जडणघडणीत तबलावादक धोंडीराम सायकर यांचे योगदान अत्यंत उल्लेखनीय राहिले आहे. बालवयापासून संगीत साधनेशी जुळलेले त्यांचे नाते आजही अखंडपणे सुरू असून, आपल्या भावपूर्ण आणि नेमक्या तबलावादनातून त्यांनी अनेक नामवंत गायक, कलावंतांच्या मैफिली संस्मरणीय केल्या आहेत. विविध सांगीतिक व्यासपीठांवर तबल्याची प्रभावी साथसंगत करताना त्यांनी भारतीय शास्त्रीय संगीताची परंपरा जपली आहे. तसेच नवोदित कलाकारांना मार्गदर्शन, स्पर्धांमध्ये परीक्षक म्हणून योगदान आणि सांस्कृतिक क्षेत्रातील सातत्यपूर्ण कार्यामुळे शहराच्या सांस्कृतिक वातावरणाला त्यांनी समृद्ध केले आहे. त्यांच्या या उल्लेखनीय कार्याची दखल घेत त्यांना विविध प्रतिष्ठित पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे.

Share.
Leave A Reply

Please Join Our WhatsApp Group
Exit mobile version