Spread the love

एसबीपीआयएम येथे झिंग २०२६ वार्षिक पारितोषिक वितरण संपन्न

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – महाविद्यालयीन काळातील वय म्हणजे खरे खोटे, बरे वाईट यातील फरक समजणारा काळ असतो. या काळात स्वतःवर विश्वास ठेऊन निर्णय घेतला पाहिजे. निश्चित केलेले ध्येय साध्य करण्यासाठी मनावर ताबा मिळवून निर्णय घ्यावे लागतात. या चंचल मनाचे आरोग्य सुदृढ रहावे यासाठी तुम्हाला आवडणारी कोणतीही किमान एक कला जोपासा आणि त्यासाठी वेळ द्या. जे काही करणार ते मन लावून करा, यश नक्की मिळेल असा सल्ला युवा अभिनेता अतुल कुदळे यांनी विद्यार्थ्यांना दिला.

पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या एस. बी. पाटील इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट येथे “झिंग २०२६” हा वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्ष पद्माताई भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, विश्वस्त हर्षवर्धन पाटील, उद्योजक नरेंद्र लांडगे, अजिंक्य काळभोर, कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाला.
संचालिका डॉ. किर्ती धारवाडकर यांनी सांगितले की, संस्थेच्या विद्यार्थ्यांनी विविध आंतर महाविद्यालयीन स्पर्धांमध्ये बक्षिसे जिंकली आहेत, तसेच शैक्षणिक गुणवत्तेतही उत्कृष्ट कामगिरी नोंदवली आहे. अनेक विद्यार्थ्यांनी नामांकित कंपन्यांमध्ये प्लेसमेंट मिळाली असून संस्थेचा लौकिक वाढवला आहे.

यावेळी शैक्षणिक, सांस्कृतिक, क्रीडा तसेच प्लेसमेंट क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला.
डॉ. प्रणिता बुरबुरे, डॉ. दिलीप पवार, डॉ. भूषण परदेशी, प्रा. समीर ठाकूर यांनी संयोजन केले.
सूत्रसंचालन डॉ. रुपाली कुदरे, आभार डॉ. अमरीश पद्मा यांनी मानले.

Share.
Leave A Reply

Please Join Our WhatsApp Group
Exit mobile version