Spread the love

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कार्यालय, खराळवाडी, पिंपरी येथे १ मे महाराष्ट्र दिन व कामगार दिननिमित्त शहराध्यक्ष योगेश बहल यांच्या हस्ते ध्वजारोहन करण्यात आले. महाराष्ट्र दिनानिमित्ताने कार्यकर्त्यांनसमोर आपले भाषण करतांना ते म्हणाले की, महाराष्ट्र हे देशातील एक प्रगत राज्य आहे व महाराष्ट्र हे अखंड राज्य असून महाराष्ट्रासाठी १०५ हुतात्मे शहीद झाले आहेत त्यांना देखील मी अभिवादन करतो. तसेच कामगार दिनानिमित्त कामगारांचा देखील गौरव होणे आवश्यक आहे. कारण कामगारांनी देशाच्या विकासासाठी खूप मोठे योगदान दिलेले आहे. तसेच आज महाराष्ट्र दिनानिमित्ताने महाराष्ट्र राज्याला मी मानाचा मुजरा करतो. तसेच तथागत भगवान गौतम बुद्ध जयंती (बुद्ध पौर्णिमा) निमित्त सर्वांना शुभेच्छा देतो. यावेळी महिला अध्यक्षा कविता आल्हाट तसेच मा.नगरसेवक ॲड.गोरक्ष लोखंडे यांनी देखील आपले मनोगत व्यक्त केले.

तसेच कार्यक्रमावेळी सेवादल अध्यक्ष ज्ञानेश्वर उर्फ माऊली मोरे यांची पिंपरी ‍चिंचवड शहर (जिल्हा) सेवादल कार्यकारणीचा विस्तार करण्यात आला. शहराध्यक्ष योगेश बहल, गटनेते भाऊसाहेब भोईर व प्रमुखांच्या हस्ते शहर उपाध्यक्ष पदी चतुर आहेर, शहर कार्याध्यक्ष पदी बाबासाहेब चौधरी, अलंकार हिंगे,अभिजीत आल्हाट, तर भोसरी विधानसभा अध्यक्ष पदी प्रविण पिंजण यांना पद निवडीचे नियुक्ती पत्र देण्यात आले.

Share.
Leave A Reply

Please Join Our WhatsApp Group
Exit mobile version