पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – आम आदमी पार्टीने पिंपरी चिंचवड शहरात संघटन अधिक मजबूत करण्यासाठी आणि शहरातील नागरिकांचे प्रश्न आक्रमकपणे मांडण्यासाठी महत्त्वाची घोषणा केली आहे. पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वाकडून वैजनाथ शिरसाट यांची ‘आम आदमी पार्टी पिंपरी चिंचवड शहर अध्यक्षपदी अधिकृत निवड करण्यात आली आहे.
वैजनाथ शिरसाट यांची पक्षाप्रती असलेली निष्ठा, जनसंपर्क आणि राजकारणात मध्ये असलेली त्यांची पकड लक्षात घेऊन ही जबाबदारी त्यांच्यावर सोपवण्यात आली आहे. आगामी काळात शहरात सुशिक्षित बेरोजगार, पाणी प्रश्न, विद्यार्थ्यांना चांगल्या दर्जाचे मोफत शिक्षण, आणि दिल्ली व पंजाब चे मॉडेल , पक्षाची भूमिका तळागाळातील जनतेपर्यंत पोहोचवण्याचे व संघटनात्मक बांधणी करण्याचे मोठे आव्हान त्यांच्यासमोर असणार आहे.
निवडीनंतर प्रतिक्रिया देताना वैजनाथ शिरसाट म्हणाले की, पक्षाने माझ्यावर जो विश्वास दाखवला आहे, त्याबद्दल मी अरविंद केजरीवाल आणि पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वाचे आभार मानतो. पिंपरी चिंचवड मधील जनतेच्या मनात प्रस्थापित राजकारणाविरुद्ध मोठा असंतोष आहे. शिक्षण, रोजगार आणि उत्तम दर्जाच्या शाळा यांसाठी आम आदमी पार्टी हाच सक्षम पर्याय आहे, हे आम्ही प्रत्येक नागरिका पर्यंत पोहोचवू. शहराच्या कानाकोपऱ्यात पक्षाचे संघटन अधिक बळकट करणे हे माझे पहिले उद्दिष्ट असेल.”
या निवडीबद्दल पक्षाच्या विविध स्तरांतून त्यांचे स्वागत होत असून, सोशल मीडियाच्या माध्यमातूनही सामाजिक क्षेत्रातील कार्यकर्ते राजकीय मंडळी व जनतेचा त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
