Spread the love

 

विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी ‘मत’ दिले, आता ‘पत’ मिळवण्यासाठी आपला लढा : डॉ. बाबा कांबळे

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – “विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय घटनेच्या माध्यमातून देशातील प्रत्येक नागरिकाला ‘एक व्यक्ती, एक मत’ हा अधिकार देऊन समानतेची क्रांती घडवून आणली. आज गरिबाच्या मतालाही पंतप्रधानांच्या मताइतकीच किंमत आहे.

“मात्र, दिवसरात्र कष्ट करणाऱ्या रिक्षा चालक, टॅक्सी चालक आणि असंघटित कष्टकऱ्यांना समाजात अद्याप हक्काची ‘पत’ (सन्मान आणि आर्थिक स्थैर्य) मिळालेली नाही. हीच पत आणि कष्टाला सन्मान मिळवून देण्यासाठी आमचा लढा सुरू आहे,” असे प्रतिपादन

महाराष्ट्र रिक्षा पंचायतीचे संस्थापक अध्यक्ष गोरगरीब कष्टकऱ्यांचे नेते डॉ. बाबा कांबळे यांनी केले.

महाराष्ट्र रिक्षा पंचायत संलग्न डांगे चौक येथील विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर रिक्षा स्टँडच्या वतीने आयोजित जयंती उत्सवात रिक्षा चालकांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते.

असंघटित क्षेत्रातील ४५ कोटी जनतेसाठी संघर्षाची हाक

डॉ. बाबा कांबळे पुढे म्हणाले की, “देशात ४५ कोटींहून अधिक असंघटित कामगार आहेत. या कष्टकऱ्यांच्या श्रमाला किंमत मिळायला हवी. कल्याणकारी मंडळाच्या माध्यमातून रिक्षा चालकांना ओळख आणि सन्मान मिळवून देण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. मंडळाचे कार्ड प्राप्त झाल्यावर रिक्षा चालक कष्टकऱ्यांना समाजात प्रतिष्ठा मिळेल. तसेच, कष्टकऱ्यांना म्हातारपणी पेन्शन मिळावी ही आमची प्रमुख मागणी असून, या लढ्यात सर्व ऑटो-टॅक्सी चालक आणि कष्टकरी जनतेने मोठ्या संख्येने सहभागी होते.

या कार्यक्रमाला वाकड वाहतूक विभागाचे पोलीस निरीक्षक बापू दत्तात्रय डेरे, हवालदार श्री पोट साहेब, आणि महाराष्ट्र रिक्षा पंचायत युवक अध्यक्ष शुभम तांदळे, पिंपरी-चिंचवड शहरी युवक अध्यक्ष विशाल ससाने, रिक्षा ब्रिगेडचे महाराष्ट्र मुख्य संघटक धनंजय कुदळे, विद्यार्थी वाहतूक विभागाचे अध्यक्ष प्रदीप अय्यर, शहर उपाध्यक्ष भाऊसाहेब शेलार यांसह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.

संयोजकांचे परिश्रम
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संग्राम शिंदे, मयूर आढगळे, लाजित बागवान, आसिफ शेख, लक्ष्मण ओवाळ,मच्छिंद्र जोगदान, अक्षय गायकवाड, अर्जुन धोत्रे, शुभम कदम, मारुती शितोळे, विजयकुमार सूतकर, अजित शितोळे, बापू कांबळे, सागर लोंढे आणि विजय जावळे, अमित धुमाळ,यांनी विशेष परिश्रम घेतले.

Share.
Leave A Reply

Please Join Our WhatsApp Group
Exit mobile version