Spread the love

 

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या डॉ. दिव्या सागर चरण यांना सामाजिक न्याय व कामगार कल्याण क्षेत्रातील योगदानाबद्दल लुईझियाना रिसर्च युनिव्हर्सिटीतर्फे मानद डॉक्टरेट (Honorary Doctorate) प्रदान करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, वाल्मीकि समाजातून मानद डॉक्टरेट मिळवणाऱ्या त्या पहिल्या महिला ठरल्या आहेत.

डॉ. चरण या ससून रुग्णालयाच्या दक्षता समितीच्या (Vigilance Committee) पहिल्या महिला सदस्य म्हणूनही कार्यरत असून, त्यांनी या माध्यमातून सफाई कामगार व वंचित घटकांच्या प्रश्नांना प्रभावीपणे कार्य केले आहे.

गेल्या अनेक वर्षांपासून त्यांनी सफाई कामगार, वंचित व दुर्बल घटकांच्या हक्कांसाठी सातत्याने लढा देत महत्त्वपूर्ण कामगिरी बजावली आहे. त्यांच्या प्रयत्नांमुळे अनेक सफाई कामगारांच्या सुरक्षितता, सन्मान आणि मूलभूत अधिकारांच्या प्रश्नांना न्याय मिळवून देण्यात यश आले आहे.
सदर मानद पदवी ही त्यांच्या सात वर्षांच्या समर्पित सेवेला आणि सामाजिक न्यायासाठी केलेल्या अथक प्रयत्नांना दिलेली दाद असल्याचे विद्यापीठाने नमूद केले आहे. समाजातील उपेक्षित घटकांचे प्रश्न प्रभावीपणे मांडून त्यांनी सामाजिक परिवर्तन घडवून आणण्यास हातभार लावला आहे.

या मानद डॉक्टरेट प्रदान सोहळ्याचे आयोजन १९ एप्रिल २०२६ रोजी पुणे, महाराष्ट्र येथे करण्यात येणार आहे. या सन्मानाबद्दल विविध स्तरांतून त्यांचे अभिनंदन होत आहे.

Share.
Leave A Reply

Please Join Our WhatsApp Group
Exit mobile version