Spread the love

 

चिंचवड (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) –  चिंचवड येथील प्रतिभा ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटमधील प्रतिभा इंटरनॅशनल स्कूल, प्रतिभा कॉलेज ऑफ कॉमर्स अँड कॉम्प्युटर स्टडीज, प्रतिभा ज्युनिअर कॉलेज आणि प्रतिभा इन्स्टिट्यूट ऑफ बिझनेस मॅनेजमेंटच्या सुमारे ५००० विद्यार्थी व शिक्षकांनी एकत्र येत विश्वशांतीसाठी नवकार महामंत्राच्या जपात आज उत्साहात सहभाग नोंदवला.

यावेळी संस्थेचे संस्थापक-सचिव डॉ. दीपक शहा म्हणाले, “संपूर्ण विश्वाच्या शांती आणि सकारात्मक ऊर्जेसाठी ‘विश्व नवकार दिवस’ आज एकाच वेळी जगभरात साजरा करण्यात येत आहे. समाजात एकता, शांती आणि सद्भावना वृद्धिंगत करण्यासाठी या सामुदायिक नवकार महामंत्र जपाचे जगभरात आयोजन करण्यात आले आहे.” जगात शांतता नांदो, या हेतूने ‘जितो’ पुण्याच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. क्षितिजा गांधी यांनी नवकार महामंत्राचे महत्त्व उपस्थितांना सविस्तरपणे विशद केले.

या कार्यक्रमाला कमला एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक-सचिव डॉ. दीपक शहा, प्राचार्या डॉ. क्षितिजा गांधी, एमबीएचे संचालक डॉ. सचिन बोरगावे, प्रतिभा ज्युनिअर महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. वनिता कुऱ्हाडे, प्रतिभा शिक्षणशास्त्र महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. पौर्णिमा कदम, प्रतिभा स्कूलच्या मुख्याध्यापिका डॉ. वृंदा जोशी आणि संस्थेचे मुख्य प्रशासकीय अधिकारी डॉ. राजेंद्र कांकरिया यांच्यासह विविध विभागांचे विभागप्रमुख, प्राध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. त्यांच्या समवेत सुमारे ५००० विद्यार्थ्यांनी या सामुदायिक नवकार महामंत्र जपात सहभाग नोंदवत विश्वशांतीचा संदेश दिला.

Share.
Leave A Reply

Please Join Our WhatsApp Group
Exit mobile version