Spread the love

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी चिंचवड महानगरपालिकेकडून पिंपरी चिंचवड शहरातील फेरीवाल्यांचे सर्वेक्षण करण्यात आले आहे मागील काही दिवसांपासून आचारसंहिता व इतर कारणामुळे पथ विक्रेता कायद्याचे काम थांबलेले होते ते आता सुरू करू यासाठी लवकरच बैठकीचे आयोजन करू असे आश्वासन महानगरपालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी दिले.

नॅशनल हॉकर फेडरेशन, महाराष्ट्र फेरीवाला क्रांती महासंघ व पथ विक्रेता समिती शिष्टमंडळाने आज आयुक्तांची भेट घेऊन निवेदन देत फेरीवाला प्रश्नांवर सविस्तर चर्चा केली.

यावेळी महासंघाचे अध्यक्ष काशिनाथ नखाते, पथ विक्रेता समिती सदस्य राजू बिराजदार, किरण साडेकर, किसन भोसले, अलका रोकडे, सलीम डांगे, महासंघाचे कार्याध्यक्ष इरफान चौधरी, मनोज यादव, सलीम शेख, सुनील भोसले, विशाल चंपावत, नंदू आहेर आदी पदाधिकारी उपस्थित होते.

महानगरपालिकेच्या आयुक्त पदी निवड झाल्याबद्दल सर्वांनी अभिनंदन केले. पिंपरी चिंचवड शहरातील अ, ब, क, ड, ई, फ या आठ ही क्षत्रिय कार्यालय अंतर्गत शुल्क भरलेल्या विक्रेत्यांना प्रमाणपत्र देण्यात यावे, हॉकर्स झोनची अंमलबजावणीसाठी क्षत्रिय कार्यालय अंतर्गत बैठकाचे आयोजन करण्यात यावे, व्यवसाय नसलेल्यांची भ्रष्टाचार करून बोगस सर्वेक्षण द्वारे नावे घुसवली आहेत ती रद्द करावी, हॉकर झोनच्या ठिकाणी सोयीसुविधा देणे, कारवाई थांबवणे आदी विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. यावेळी आयुक्त यांनी हॉकर्स झोनची प्रक्रिया गरजेचे असून याबाबत आपण लवकरच बैठकीचे आयोजन करून सदर मागण्यांवर सकारात्मक विचार करू असे आयुक्त सूर्यवंशी यांनी व्यक्त केले.

Share.
Leave A Reply

Please Join Our WhatsApp Group
Exit mobile version