Spread the love
रहाटणी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – रहाटणी प्रभागातील गजानन नगर परिसरामध्ये नागरिकांना भेडसावत असलेल्या पाण्याच्या कमी दाबाच्या समस्येचे अखेर समाधान करण्यात आले आहे. या भागात नवीन (कमी दाबाच्या) जलवाहिनीला जुन्या मुख्य जलवाहिनीशी जोडण्याचे काम यशस्वीरीत्या पूर्ण करण्यात आले.
नगरसेवक बाबासाहेब त्रिभुवन यांनी नागरिकांच्या तक्रारींची तात्काळ दखल घेत आमदार श्री. शंकरभाऊ जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली महापालिका प्रशासनाकडे पाठपुरावा केला. त्यांच्या प्रयत्नांमुळे ही समस्या अल्पावधीत मार्गी लागली असून, आता नागरिकांना नियमित व पुरेशा दाबाने पाणीपुरवठा होण्यास मदत होणार आहे.
या कामामुळे स्थानिक रहिवाशांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे. भविष्यातही अशाच प्रकारे नागरिकांच्या समस्या सोडविण्यास प्राधान्य दिले जाईल.
याप्रसंगी पाणीपुरवठा विभागाचे उपअभियंता  ऋषिकेश गेंगजे, कनिष्ठ अभियंता समीक्षा मालपुरे यांच्यासह स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Share.
Leave A Reply

Please Join Our WhatsApp Group
Exit mobile version