Spread the love

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज)- डॉ. विजय सूर्यवंशी यांनी शहराचे सौंदर्य व स्वच्छता राखण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन करत अनधिकृत जाहिरात फलक, बॅनर्स व भिंतींवरील जाहिरातींवर कडक कारवाईचा इशारा दिला आहे.

पिंपरी चिंचवड महानगरपालिका हद्दीत सार्वजनिक ठिकाणी अनधिकृतपणे लावण्यात येणाऱ्या फ्लेक्स, बॅनर्स, जाहिरातींमुळे शहराचे विद्रुपीकरण होत असल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आले आहे. यासाठी सर्व क्षेत्रीय अधिकारी व बीट निरीक्षकांना नियमित पाहणी करून असे फलक तात्काळ हटविण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

तसेच संबंधित जाहिरातदारांना नोटिसा बजावून दंडात्मक कारवाई करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. अनधिकृत जाहिरातींवर नमूद मोबाईल क्रमांकाच्या आधारे संबंधितांवर थेट कारवाई केली जाणार आहे.

महापालिकेने स्पष्ट केले आहे की, नियमांचे उल्लंघन केल्यास महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमांतर्गत कारवाई करून फलक हटविण्याचा खर्चही संबंधितांकडून वसूल केला जाईल.

“शहर स्वच्छ व सुंदर ठेवण्यासाठी सर्वांनी नियमांचे पालन करणे आवश्यक आहे,” असे आवाहन आयुक्त सूर्यवंशी यांनी केले.

Share.
Leave A Reply

Please Join Our WhatsApp Group
Exit mobile version