Spread the love

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज)  – पिंपरी-चिंचवड परिसरात आमदार शंकर जगताप यांच्या वाढदिवसानिमित्त दि. ५ एप्रिल २०२६ रोजी सकाळी १० ते २ या वेळेत भव्य ‘महा आरोग्य शिबिर’ाचे आयोजन करण्यात आले आहे. नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्याच्या उद्देशाने आयोजित या शिबिराला मोठा प्रतिसाद अपेक्षित आहे.

हे आरोग्य शिबिर नगरसेवक विनोद  जयंवत नढे यांच्या जनसंपर्क कार्यालय, पवना चौक, नेहरूनगर, काळेवाडी येथे पार पडणार आहे. या उपक्रमात SMD Multispeciality Hospital तसेच YCM (Yashwantrao Chavan Memorial) Hospital यांचे तज्ज्ञ डॉक्टर सहभागी होणार आहेत.

शिबिरात नागरिकांना डॉक्टरांचे मोफत मार्गदर्शन, रक्तदाब (BP), BMI, ECG, ब्लड शुगर (Fasting & PP), HbA1c यांसारख्या तपासण्या सवलतीच्या दरात उपलब्ध होणार आहेत. तसेच सर्व रक्त तपासण्यांवर ५०% सूट, औषधांवर २०% सूट आणि CT Scan, MRI, USG वर २०% सवलत देण्यात येणार आहे. याशिवाय लिपिड प्रोफाइल आणि व्हिटॅमिन D3 तपासणी मोफत करण्यात येणार आहे.
तसेच नेत्र, कान-नाक-घसा, हृदय, किडनी, यकृत, कर्करोग आदी विविध आजारांवर तपासणी व उपचाराची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. याचबरोबर रक्तदान शिबिराचेही आयोजन करण्यात आले असून प्रत्येक रक्तदात्यास स्मार्ट वॉच देण्यात येणार आहे.

थेरगाव हॉस्पिटलमधील रुग्णांना मोफत फळवाटपाचा उपक्रमही राबविण्यात येणार आहे. या उपक्रमाद्वारे नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन आरोग्य तपासणीचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

Share.
Leave A Reply

Please Join Our WhatsApp Group
Exit mobile version